Deepika Padukone : दिग्दर्शक करण जोहरच्या कॉफी विथ करण सीझन 8 च्या पहिल्या एपिसोडमध्ये दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग आले होते. त्यांचा एपिसोड समोर आल्यानंतर दीपिका पदुकोणवर सोशल मीडियावर बऱ्याच प्रमाणात टीका करण्यात येत होती. यातील काही व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर दीपिका आणि रणवीरला ट्रोल करणारे अनेक मीम्स बनवले गेले. रणवीरच्या आधी दीपिकाने कोणासोबत वेळ घालवला? अशा आशयाचे अनेक मीम्स होते. मात्र आता दीपिकाच्या भूतकाळतल्या आयुष्यावरुन उघडपणे टीका करण्यात आली आहे. बनारस हिंदू विद्यापिठात हा सगळा प्रकार घडल्याचा दावा केला जात आहे मात्र याबाबत अद्यापही माहिती समोर आलेली नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ बनारस हिंदू विद्यापीठाच्या वार्षिक महोत्सवातील असल्याचा दावा केला जात आहे. या फेस्टमध्ये दीपिकाच्या अफेअर्स आणि पर्सनल लाइफवर एक रॅम्प शो करण्यात आला होता. या रॅम्प वॉकमध्ये दीपिकाच्या आयुष्यात आलेल्या विद्यार्थ्यांना दाखवण्यात आलं होतं. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर नेटकऱ्यांना प्रचंड नाराजी व्यक्त करत दीपिकाच्या बाजूने भाष्य केले आहे. अशा प्रकारे एखाद्याच्या वैयक्तिक आयुष्याशी छेडछाड केली जाऊ शकत नाही, असे लोकांनी म्हटलं आहे.


हा व्हिडिओ इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसच्या वार्षिक महोत्सवातील असल्याचेही म्हटलं जात आहे. 4 ते 8 नोव्हेंबर 2023 या कालावधीत ELIXIR नावाचा फेस्टिवल पार पडला. या फेस्टिवलमध्ये फॅशन शो आणि रॅम्प वॉकचा कार्यक्रमही झाला, ज्याला 'लिबास' असे नाव देण्यात आले. व्हायरल झालेला व्हिडिओ त्याच कार्यक्रमातील आहेत. काही विद्यार्थ्यांनी मिळून 'लिबास' मध्ये दीपिका पदुकोणच्या डेटिंग लाइफवर एक परफॉर्मन्स सादर केला.


व्हिडीओमध्ये डोक्यावर पदर घातलेली एक मुलगी दीपिकाच्या वेषात दिसत आहे आणि तिच्या मागे बाजीराव मस्तानी चित्रपटातील एका गाण्याचा व्हिडिओ आहे ज्यामध्ये दीपिका पदुकोण नाचत आहे. यानंतर एकामागून एक व्हिडिओ बदलतो आणि दीपिकाचे तिच्या एक्स बॉयफ्रेंडसोबतचे फोटो दिसायला लागतात. त्यानंतर स्टेजवरही एकामागून एक मुलं तिच्या एक्स बॉयफ्रेंडच्या भूमिकेत चालत येतात. यावेळी तिथे उपस्थित असलेले विद्यार्थी मोठ्याने हसताना ऐकू येत आहेत.



व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, नेटकऱ्यांनी या संताप व्यक्त केला आहे. रिया नावाच्या युजरने, 'हे वाराणसी, यूपीचे बीएचयू आहे. दीपिका पदुकोणचा भूतकाळ दाखवण्यासाठी एक ड्रामा शो आयोजित करण्यात आला होता, ज्यामध्ये तिने भूतकाळात अनेकांना डेट केले होते हे दाखवण्यात आले होते. यासारखे स्वस्त आणि निकृष्ट काम कोणीही करू शकत नाही, असे म्हटलं आहे. दुसऱ्या एका युजरने मीम्स आणि जोक्स समजण्यासारखे आहेत पण फेस्ट किंवा इतर कोणत्याही कार्यक्रमात असे सादरीकरण करणे हे स्टेजच्या प्रतिष्ठेच्या आणि संस्थेच्या सन्मानाच्या विरुद्ध आहे,' असे म्हटलं आहे. आणखी एका नेटकऱ्याने हे खरोखरच लाजिरवाणे आहे, आता हा विनोद राहिलेला नाही, असे म्हटलं आहे.