मुंबई : बॉलिवुडमध्ये महेश भट्ट यांच्या 'जिस्म' चित्रपटातून एन्ट्री करणाऱ्या सनी लिओनीने बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये आपली ओळख निर्माण केली आहे. आज सनी ३८वा वाढदिवस साजरा करत आहे. सनीचा बॉलिवुडमध्ये पदार्पण करण्याचा किस्सा मजेशीर आहे. महेश भट्ट यांनी त्यांच्या 'कलयुग' चित्रपटासाठी सनीला ऑफर केली होती. सनीने त्यावेळी महेश भट्ट यांच्याकडे १० डॉलर रुपयांची मागणी केली होती आणि ही रक्कम ऐकून निर्माते, दिग्दर्शक या सर्वांनाच धक्का बसला होता. सनीच्या या मागणीने महेश भट्ट यांनी सनीला चित्रपटात घेण्याचा विचार बदलला होता. त्यानंतर सनीने 'जिस्म-२' मधून महेश भट्ट यांच्यासोबत काम केलं आणि त्यानंतर मात्र बॉलिवुडमध्ये सनीकडे कामांसाठी रांगच लागू लागली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१३ मे १९८१ मध्ये कॅनडातील ओन्टारियोमध्ये एका सिख पंजाबी कुटुंबात सनीचा जन्म झाला. तिचं खरं नाव करणजीत कौर वोहरा आहे. १९९६ मध्ये सनीचं कुटुंब दक्षिण कॅलिफोर्नियामध्ये स्थलांतरित झालं. १९९९ मध्ये सनीने शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर कॉलेजमध्ये अॅडमिशन घेतलं. लहान असताना सनीला हॉकी, स्केटिंग खेळायला आवडायचं.



सनीने पॉर्न इंडस्ट्रीमध्ये पाऊल टाकण्याआधी बेकरी आणि टेक्स अॅन्ड रिटायरमेंट फर्ममध्येही काम केलं आहे. सनीच्या शाळेतील एका वर्गमित्राने तिला मॉडलिंग करण्याचा सल्ला दिला होता. एका फोटोग्राफरशी ओळख झाल्यानंतर तिने पेंटहाउस मॅगझिनसाठी फोटोशूट केलं होतं. त्यानंतर तिला अनेकांच्या ऑफर येऊ लागल्या. मॅगझिनसाठी न्यूड फोटो काढण्यात तिला अधिक वाव, संधी वाटत होती, भरपूर पैसा आणि देश-विदेश फिरण्याची संधीही होती. त्यामुळे ती या दिशेने पाऊलं टाकत गेली. २००३ मध्ये सनीने विविड इंटरटेन्मेंटसह तीन वर्षांचा करार करत तिने पोर्नोग्राफी जगात पाऊल ठेवलं. 



चित्रपट दिग्दर्शक महेश भट्ट यांनी टेलिव्हिजन शो 'बिग बॉस'मध्ये सनीला आपल्या चित्रपटाची गोष्ट सांगितली. सनीला ही गोष्ट आवडली आणि तिने 'जिस्म-२' मध्ये प्रमुख भूमिका साकारली. २०१४ साली तिने 'हेट लव्ह स्टोरी'मध्ये एक गाणंही साकारलं. 'जिस्म-२' नंतर सनीने 'जॅकपॉट', 'रागिनी एमएमएस २', 'एक पहेली लीला', 'कुछ कुछ लोचा है' आणि 'मस्तीजादे' यांसारख्या चित्रपटातून काम केलं आहे. याशिवाय शूटआउट अॅट वडाला', 'हेट स्टोरी २', 'बलविंदर फेमस हो गया' आणि 'सिंह इज ब्लिंग' या चित्रपटातून तिने पाहुण्या कलाकारची भूमिका साकारली. सनी लिओनीने जवळपास ३५ अडल्ट फिल्ममध्ये काम केलं आहे. सनीने तिला कोणत्याही पुरस्कराची हाव नसून केवळ चाहत्यांचं प्रेम मिळावं अशी इच्छा असल्याचं तिने म्हटलंय.