KBC 16 Amitabh Bachchan : 'कौन बनेगा करोडपती 16' या शोकडे सगळेच माहितीचा स्त्रोत म्हणून पाहतात. यावेळी एपिसोडमध्ये स्पर्धकांमध्येच एक स्पर्धा पाहायला मिळाली. त्यासाठी 5 राउंड झाले. हा राउंड प्ले अलॉन्गच्या 10 स्पर्धकांपैकी एक आहे. फास्टेस्ट फिंगर फर्स्ट राऊंड जिंकणाऱ्या टॉप दोन स्पर्धकांमध्ये हा राउंड झाला. या राउंडमध्ये स्पर्धकांना हॉटसीटवर बसण्यासाठी तब्बल 5 राऊंड जिंकावे लागतात. या राऊंडमधील प्रश्नांची उत्तर दिल्यानंतर स्पर्धकाला 6 प्रश्न विचारावे लागले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

‘कौन बनेगा करोड़पति 16’ मध्ये पहिल्यांदा भारतीय चॅलेंजर वीकमध्ये दिल्ली अंकिता सिंग विजयी ठरल्या. अंकिता यांच्याविषयी सांगायचं झालं तर अंकिता यूपीएसएसी परिक्षार्थी आणि तिचं हायड्रोपोनिक फार्मिंगचं स्टार्टप देखील आहे. अमिताभ यांनी लगेच उत्साही होत हायड्रोपोनिक फार्मिंगचं म्हणजे काय याविषयी विचारताच. अंकितानं अमिताभ आणि तिथे उपस्थित असलेल्या प्रेक्षकांना हायड्रोपोनिक फार्मिंगचं ही नक्की कसली कॉन्सेप्ट आहे याविषयी सांगितलं. त्याशिवाय तिनं मस्करीमध्ये अमिताभ यांना सल्ला दिला की त्यांना हवं असेल तर बंगल्याच्या टेरेसवर ते अगदी सहजपणे स्वत:चं ऑर्गॅनिक फार्म करु शकतात. 


अमिताभ बच्चन यांनी जेव्हा अंकिता सिंगला विचारलं की तिनं त्यांच टेरेस कुठे पाहिलं. तर अंकितानं उत्तर दिलं की तिनं हे सोशल मीडिया अकाऊंटवर पाहिलंय. त्यावर अमिताभ हसत म्हणाले, माझ्या घराचं टेरेस मोठं नाही, मी खरंच एका छोट्या घरात राहतो. त्याच्या शेजारी ते मोठं घर आहे जे तुम्ही पाहिलय.


हेही पाहा : 'सिंघम अगेन' येताच रोहित शेट्टी चौथ्या पार्टच्या तयारीला; आता नव्या मिशनवर येणार 'चुलबुल'


अमिताभ बच्चननं अंकिताशी कृषि संबंधीत कोणत्या गोष्टी गरजेच्या असतात त्याविषयी विचारलं, इतकंच नाही तर शेतीच्या भविष्याविषयी देखील तिला प्रश्न विचारले. त्यावर उत्तर देत अंकितानं सांगितलं की 'तुम्ही एगदी छोट्या लेव्हलला जाऊन सुरुवात करु शकता, पण त्याला मोठ्या प्रमाणात वाढवण्यासाठी तुम्हाला एका मोठ्या सेटअपची गरज असते. त्यासाठी फंडिंगची आवश्यकता असते. केबीसी एक मोठा प्लॅटफॉर्म आहे. त्यामुळे हे आता आणखी लोकांपर्यंत पोहचण्यास मदत होईल.'