उर्फी जावेद विचित्र कपडे नाही तर आणखी एका बोल्ड गोष्टीमुळे चर्चेत
आणखी एका वेगळ्या गोष्टीमुळे उर्फी जावेद चर्चेत...
मुंबई : बिग बॉसच्या ओटीटी घरातून बाहेर पडल्यानंतर उर्फी जावेद तिच्या ड्रेसेजमुळे सतत चर्चेत असते. उर्फी जावेद तिच्या ड्रेसिंगमुळे सध्या चर्चेत असते आणि ही गोष्ट स्वत: अभिनेत्रिने एका मुलाखतीत मान्य केली आहे की, तिला तिच्या कपड्यांनीत प्रसिद्धी मिळवून दिली आहे. पण आता उर्फी तिच्या विचित्र कपड्यांमुळे नाहीतर बोल्ड बेली डान्समुळे चर्चेत आली आहे.
विरल भयानी नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून उर्फीचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओमध्ये उर्फी तिच्या चाहत्यासोबत दिसत आहे. चाहत्यासोबत उर्फी वेग-वेगळ्या स्टाईलमध्ये पोज देत आहे. त्यानंतर व्हिडीओमध्ये उर्फी बेली डान्स करताना दिसत आहे.
फोटोग्राफर्ससमोर उर्फी नेहमी स्टायलिश अर्धवट घातलेल्यां कपड्यांमुळे आधीच उर्फी ट्रेल होत होती आता या तिच्या बेली डान्समुळे उर्फी चर्चेत आली आहे. तिच्या या व्हिडीओवर काहींनी पसंती दर्शवली. काही युजर्स मात्र उर्फीला ट्रोल करत आहेत.
फोटोग्राफर्ससमोर उर्फी स्टाईलमध्ये उभी असते. तिने आपली आपला बॅकलेस ड्रेस दाखवत देखील खूप साऱ्या पोज दिल्या आहेत. उर्फी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे.