Urfi Javed And Ex Boyfriend Paras Kalnawat: ग्लॅमर गर्ड उर्फी जावेद आणि टीव्ही अभिनेता पारस कलनावत यांचं ब्रेकअप झालं होतं. पारस कलनावत आणि उर्फी हे दोघं पहिल्यांदा 'मेरी दुर्गा'च्या सेटवर एकत्र भेटले होते. या कार्यक्रमाच्या शूटिंग दरम्यान या दोघांच्या नात्याला प्रेमाचा रंग चढला. मात्र 2017 मध्ये या दोघांचं ब्रेकअप झालं. ब्रेकअपनंतर उर्फीने लहानपणाची चूक असल्याचं सांगत पारस लहान असून पजेसिव असल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर कायमत या दोघांमध्ये कोल्ड वॉर पाहायला मिळलं. दोघांनी एकमेकांवर अनेकदा आरोपांच्या फैरी झाल्या आहेत. मात्र पुन्हा एकदा या दोघांचं सूत जुळत असल्याचं चित्र दिसत आहे. तसेच सोशल मीडियावर दोघंही उघड उघड एकमेकांची स्तुती करताना दिसत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उर्फीने 'झलक दिखला जा' सीझन 10 या डान्स रिअ‍ॅलिटी शोमध्ये पारस कलनावतच्या कामगिरीचे कौतुक केलं होतं. सोशल मीडियावर डान्सचा प्रोमो शेअर करून पारसचं कौतुक केलं होतं. पोस्टमध्ये उर्फीने लिहिले होतं की, "तुला पुढे जाताना पाहून मला खूप अभिमान वाटतो." त्याचबरोबर पोस्टमध्ये हार्ट इमोजीही बनवला होता. उर्फीने पारसचे असे कौतुक करताना पाहून लोकांनाही आश्चर्य वाटले.


पारसने उर्फिच्या पोस्टवर प्रतिक्रिया देताना एका वृत्तपत्राला सांगितले की, "उर्फीच्या मेहनतीचा आणि समर्पणाचाही अभिमान आहे." तसेच पारसने उघडपणे सांगितलं की, दोघांमध्ये आता कोणताही वाद नाही. दोघेही एकमेकांचा आदर करतात.