Urfi Javed Engaged : उर्फी जावेदला कोणी ओळखत नाही, अशी एकही व्यक्ती सापडणार नाही. तिच्या विचित्र फॅशन आणि बोल्ड आउटफिट्समुळे ती कायम चर्चेत असते. तिच्या विचित्र अतरंगी कपड्यांमुळे अनेक वेळा नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे. पण सध्या सोशल मीडियावर तिची चर्चा एका वेगळ्या कारणाने होते. सोशल मीडियावर तिचे काही फोटो तुफान व्हायरल झाले आहेत. ज्यामध्ये उर्फी एका मिस्ट्री मॅनसोबत पूजा करताना दिसत आहे. त्यामुळे उर्फीने गुपचूप साखरपुडा केला आणि त्याचा रोका सोहळ्याचे हे फोटो असल्याचं चाहत्यांना वाटत आहे. (urfi javed get secretly engaged roka ceremony private photos viral on internet)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोमध्ये उर्फी जावेद एका व्यक्तीसोबत हवन कुंडासमोर पूजा करताना दिसत आहे. तिथे एक पंडितही उपस्थित असल्याचं दिसून येतं आहे. या फोटोमुळे नेटकऱ्यांनी चाहत्यांनी अंदाज लावला आहे की, हा व्यक्ती तिच्या होणारा नवरा आहे. त्याशिवाय हे फोटो रोको समारंभाचे असल्याची चर्चा रंगील आहे.



तर काही नेटकऱ्यांनी तर्क लावला आहे की, हे फोटो तिच्या पुढच्या प्रोजेक्टच्या शूटिंगचे असू शकतात. त्यामुळे आता काय खरं काय खोटं हे उर्फीच सांगू शकते.  दरम्यान नुकताच झालेल्या गणेशोत्सवात उर्फी जावेद लालबागच्या राजाच्या दर्शनाला गेली होती. त्यावेळी मुंबईतील डब्बेवाले नाराज झाले होते.