चिंताजनक : अभिनेत्री उर्फी जावेद कोकिला बेन हॉस्पिटलमध्ये दाखल
सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेदची तब्येत अचानक बिघडली
मुंबई : सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेदची तब्येत अचानक बिघडली, त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. असं सांगण्यात येत आहे की, उर्फीला खूप ताप आहे, त्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सध्या उर्फीच्या चाचण्या झाल्या आहेत, ज्याचे अहवाल येणं बाकी आहे.
उर्फी जावेदच्या जवळच्या मित्राने दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं आहे की, "अभिनेत्री बाहेर जात असली तरी गेल्या दोन-तीन दिवसांपासून तिची तब्येत खराब होती. गेल्या काही दिवसांपासून उर्फीला उलट्या सुरू आहेत. आज अभिनेत्रीला 103-104 ताप आला. त्यानंतर अखेर तिला मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करावं लागलं. या अभिनेत्रीच्या काही चाचण्या करण्यात आल्या आहेत ज्यामुळे तापाचं कारण काय आहे हे कळू शकेल. सध्या चाचण्यांचे अहवाल येणं बाकी आहे.
उर्फी पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसली.
उर्फी जावेद सोशल मीडियावर खूप सक्रिय असली तरीही, आजारी पडल्यानंतरही ती केवळ सोशल मीडियावरच सक्रिय राहिली नाही तर मुलाखतही देत होती. अलीकडेच उर्फी पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसली. उर्फीने पिवळ्या रंगाचा पारदर्शक ड्रेस घातला होता ज्यामध्ये ती खूपच हॉट दिसत होती.
तुम्ही उर्फीचे फोटो आणि व्हिडिओ पाहिले तर तुम्हाला ती आजारी आहे असं वाटणारही नाही. त्याच्या मित्राचं म्हणणे आहे की, अभिनेत्रीला गेल्या दोन-तीन दिवसांपासून उलट्या होत होत्या. मात्र, आता रिपोर्ट्स आल्यानंतर उर्फीची प्रकृती कशी आहे, हे कळेल. उर्फी जावेदने अलीकडेच सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनेत्री चाहत खन्नाचा क्लास घेतला होता.