मुंबई : इंटरनेट सेन्सेशन उर्फी जावेद नेहमीच चर्चेचा भाग असते. तिच्या खास फॅशन सेन्समुळे ती चर्चेचा भाग बनते. उर्फी तिच्या बिंधास्त शैलीसाठी देखील ओळखली जाते. तिच्या मनात जे येईल ते ती उघडपणे सांगते आणि करते देखील. तिच्या वेगळ्या शैलीसाठी ओळखली जाणारी उर्फी आजारी पडली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तिच्या आजारपणाचं कारणही खूप विचित्र आहे. उर्फीने तिच्या आजारामागील स्टोरी सोशल मीडियावर सांगितली आहे. उर्फीची अशी अवस्था पाहून तिचे चाहतेही चिंतेत पडले आहेत. उर्फीने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये तिच्या चेहऱ्यावर सूज आल्याचं दिसत आहे. उर्फीने तिच्या चेहऱ्याचा थोडासा भाग दाखवला आहे. 


ऑलिव्ह ऑईल खाणं पडलं भारी
फोटो शेअर करत उर्फीने कॅप्शनमध्ये लिहिलं की,  मी ऑलिव्ह ऑईल ऑनलाइन ऑर्डर केलं होतं. मी आणि माझ्या संपूर्ण स्टाफने त्या तेलात बनवलेलं माझं आवडतं मटर पनीर खाल्लं. ते खाल्ल्यानंतर आम्हा सगळ्यांचे डोळे सुजले आणि थकवा जाणवतोय. मला सर्वात जास्त त्रास झाला आहे. माझे डोळे ड्राय झाले आणि सुजले आहेत. आज मी थोडी तरी बरी आहे.



उर्फीने पुढे लिहिलं, मला माहिती नव्हतं की,  हे सगळं तेलामुळे होतं, म्हणून दुसऱ्या दिवशी मी त्याच तेलात मासे बनवले आणि पुन्हा तेच घडलं. जेव्हा मी माझं तेल बदललं, तेव्हा गोष्टी सामान्य झाल्या मात्र माझे डोळे ठीक होण्यासाठी वेळ घेत आहेत. आज मी पूर्वीपेक्षा खूप बरी आहे. पुढच्या स्टोरीत ऑलिव्ह ऑईलचा फोटो शेअर करत उर्फीने लिहिलं की, कदाचित त्यांनी आम्हाला एक्सपायरी डेटचं तेल पाठवलं असेल कारण 6-7 लोकांसोबत असंच घडलं आहे. असं घडणं हा योगायोग नाही.