Urfi Javed Dress From Cycle Chain : ‘बिगबॉस ओटीटी’ फेम अभिनेत्री उर्फी जावेद (urfi javed) ही सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. उर्फी तिच्या बोल्ड फोटोंमुळे बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. उर्फी सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहते. त्यामुळे ती नेहमीच चर्चेत असते. दरम्यान, नुकताच उर्फीचा एक नवा लूक सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हेही वाचा : फक्त अभिनेत्रींच का करतात आईचा रोल? बॉलिवूडमधील स्त्री-पुरुष असमानतेवर संतापली Kajol


उर्फी नेहमीच तिच्या प्रत्येक लुक आणि ड्रेसिंगसाठी ट्रोल होत असते. अलीकडेच तिनं नेटचा ड्रेस परिधान केला होता, ज्यामुळे तिला खूप ट्रोल करण्यात आले होते. उर्फीनं तिच्या इन्स्टाग्रामवर रोज नवनवीन आणि अनोखे ड्रेसिंगचे फोटो आणि व्हिडीओ शेयर करत असते. आता अलीकडेच उर्फीनं तिचा एक नवीन व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये उर्फीनं सायकलच्या चेनचा ड्रेस परिधान केला आहे. उर्फीचा हा नवीन व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.


उर्फीनं सायकल चेन पासून ड्रेस बनवला


या व्हिडिओमध्ये व्हिडिओमध्ये उर्फी सुरुवातीला सायकल चालवताना दिसत आहे. यावेळी उर्फीनं ऑलिव्ह ग्रीन रंगाची शॉर्ट्स आणि क्रॉप टॉप परिधान केली आहे. त्यानंतर अचानक तिच्या सायकलची चेन तुटते आणि यानंतर, ती काहीतरी विचार करते आणि तिच्या अंगावर सायकलच्या चेनचा ड्रेस दिसतो. उर्फीनं कोणतेही कपडे परिधान केले नव्हते. यादरम्यान ती तिचा लुक फ्लॉंट करताना डान्स करताना दिसत आहे. व्हिडिओ शेअर करताना त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'सायकल चेन.'


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


या व्हिडिओनंतर उर्फी जावेद पुन्हा एकदा सोशल मीडियावर ट्रोलच्या निशाण्यावर आली आहे. तिचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकरी कमेंट करत तिला ट्रोल करत आहेत. एक नेटकरी म्हणाला, 'Urfi ने माझी सायकल चेन चोरली आहे'. दुसरा नेटकरी म्हणाला, 'कोणत्या मुलाकडे सायकलची चेन आहे?' तिसरा नेटकरी म्हणाला की, 'हे सर्व पाहण्यासारखे नाही... मी आंधळा आहे हे चांगले झालं.' आणखी एक नेटकरी म्हणाला, 'मॅडमनं सर्वांची चेन चोरली आहे.'