Urfi Javed ला पूर्ण कपड्यात पाहून बसेल धक्का, पण आरशात पाहाल तर...
Urfi Javed चा हा नवीन लूक पाहिल्यानंतर सगळ्यांनाच धक्का बसला आहे. उर्फीनं सोशल मीडियावर शेअर केलेला हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. त्यावर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.
Urfi Javed New Look : आपल्या फॅशन (Urfi Javed Fashion) आणि वादामुळे उर्फी जावेद नेहमीच चर्चेत राहते. उर्फी जावेद नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत येते. कधी तिच्या कपड्यांमुळे तर कधी तिच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे. उर्फीला नेगमीच तिच्या कपड्यांमुळे सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. उर्फी ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. नुकताच उर्फीनं तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. सुरुवातीला उर्फीचा लूक आणि शेवटी कॅमेऱ्यात जे दिसले ते पाहून नेटकऱ्यांना धक्का बसला आहे.
उर्फीनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओच्या सुरुवातीला उर्फीनं पांढऱ्या रंगाचे शर्ट आणि काळ्या रंगाचं स्कर्ट परिधान केल्याचे दिसत आहे. तर जेव्हा कॅमेरा हा आरशाकडे वळतो तेव्हा त्यात उर्फीची एक नवीन स्टाईल पाहायला मिळते. उर्फीनं तिच्या या नव्या आऊटफिटचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. उर्फीनं बोल्ड मेकअप केल्याचे व्हिडीओत पाहायला मिळत आहे. उर्फीनं हा व्हिडीओ शेअर करत 'It's Over' असे कॅप्शन दिले आहे. उर्फीच्या या नव्या लूकच्या व्हिडीओवर कमेंट करत नेटकऱ्यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. (Urfi Javed Bold Look)
उर्फीच्या लूकवर प्रतिक्रिया देत एक नेटकरी म्हणाला, 'ही तर एक नवीन क्रिएटिव्हिटी आहे.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'सुरुवातीला व्हिडीओ पाहिल्यावर मला वाटलं की ही सुधरली आहे, पण पुढे जेव्हा व्हिडीओ पाहिला तर तिनं सांगितलंच की ती उर्फी आहे आणि ती कधी सुधारणार नाही.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'सुरुवातीला वाटलं की ती सुधारली कशी.' आणखी एक नेटकरी म्हणाला की, 'मला कळत नाही आहे की नक्की स्तुती करू की काही बोलू.' दुसरा नेटकरी, 'मला वाटलं की आज पूर्ण ड्रेसमध्ये असेल मात्र, हिनं तर माझ्या इमॅजिनेशनला मागे टाकले.'
हेही वाचा : Lata Mageshkar यांचं प्रेम जडलं तेही एका राजावर...; नात्याचा शेवट डोळ्यात पाणी आणणारा
‘बिगबॉस ओटीटी’ फेम अभिनेत्री उर्फी जावेद (urfi javed) ही सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. उर्फी तिच्या बोल्ड फोटोंमुळे बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. र्फी फक्त ठरावीक बॉडी पार्ट झाकण्यासाठी कपडे घालत असल्याचा आरोप ट्रोलर करतात. उर्फी वेगवेगळ्या वस्तुंचा वापर करुन फॅशनच्या नावावर वेगवेगळे ड्रेस बनवत असते. तर काही दिवसांपूर्वी उर्फी आता मनुष्याच्या त्वचेपासून ड्रेस बनवणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. माणसाची कातडी अजून शिल्लक आहे. एकाद्या माणसाला मारुन त्याच्या त्वचेपासून ड्रेस बनवला तर किती छान होईल ना असे भयानक उत्तर उर्फीने दिले. यामुळे आता उर्फीला मनुष्याच्या त्वचेपासून ड्रेस बनवण्याची इच्छा असल्याचे स्पष्ट होत आहे. यामुळे उर्फीचा पुढचा ड्रेस हा मनुष्याच्या त्वचेपासून असू शकतो.