उर्फी जावेद गणेश भक्तीत तल्लीन, VIDEO होतोय व्हायरल
नेहमी विचित्र कपड्यात दिसणारी उर्फी जावेदचा संस्कारी लुक पाहिलात का? पाहा VIDEO
मुंबई : अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed) नेहमीच तिच्या हटके स्टाईल आणि बोल़्ड फोटोंमुळे चर्चेत असते. तिचे हे फोटो सोशल मीडियावर तुफान धुमाकुळ घालत असतात. मात्र प्रथमचं तिचा चाहत्यांना धक्का देणारा लुक समोर आला आहे. उर्फीच्या या फोटोची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. दरम्यान उर्फीचा हा लुक नेमका आहे तरी कसा ते जाणून घेऊयात.
अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed) सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियावर व्हिडिओ आणि फोटो पोस्ट करून ती चाहत्यांच्या संपर्कात असते. विशेष म्हणजे उर्फी तिच्या हटके कपडे आणि स्टाईलमुळे नेहमीच चर्चेत असते. तिच्या या हटके स्टाईलमुळे ती नेहमीच ट्रोल देखील झाली आहे. मात्र असं असलं तरी बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह याने तिच्या या स्टाईलचं कौतूक देखील केलं होतं.
दरम्यान आता उर्फी जावेद (Urfi Javed) प्रथमचं संस्कारी लुकमध्ये समोर आली. यामध्ये ती गणेश भक्तीत तल्लीन झाल्याचे दिसत आहे. या संदर्भातला व्हिडिओ देखील तिने फॅन्ससोबत शेअर केला आहे. हा व्हिडिओ प्रेक्षकांना आवडला असून तुफान व्हायरल होत आहे.
व्हिडिओत काय?
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, उर्फी जावेदने (Urfi Javed) पंजाबी कुर्ता पायजमा असलेला ड्रेस परीधान केला आहे. या एथनिक लूकमध्ये ती खूप क्यूट दिसत आहे. इतकेच नाही तर संस्कृतमध्ये गणेशाची प्रार्थना करताना दिसली. उर्फी जावेद गणेश भक्तीत तल्लीन झालेला हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. उर्फीची ही स्टाइल चाहत्यांना खुप आवडली आहे.
कॅप्शनमध्ये चाहत्यांना ताकिद
उर्फीने व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले की, "गणपती बाप्पा मोरया!! इंडियन आयडॉलसाठी हे माझे ऑडिशन नाही, ज्याला जज व्हायचे असेल त्याने कोर्टात जावे! मी गाऊ शकत नाही आणि मला ते माहित आहे, असे लिहत तिने चाहत्यांना ट्रोलिंग आधीच ताकिद दिली होती. उर्फीला (Urfi Javed) या व्हिडिओवर ट्रोलिंग होईल असं वाटतं होतं, मात्र तसंच अजिबात झालं नाहीए. याउलट चाहत्यांचा उर्फीचा हा लुक खुप आवडला आहे. चाहत्यांनी तिच्या या स्टाईलबद्दल आणि गणेश चतुर्थीच्या तयारीबद्दल खुप कौतूक केले आहे.