उर्फी जावेदने अशा ठिकाणाहून काढली नोट की सोशल मीडियावर झाली ट्रोल
उर्फी जावेद सध्या ट्रोल होत आहे. पाहा काय आहे कारण
मुंबई : उर्फी जावेद आजकाल सोशल मीडियावर खूपच चर्चेत आहे. ती अनेकदा तिच्या नवीन लूकने लोकांना आश्चर्यचकित करताना दिसते. उर्फी जावेद आपल्या विचित्र कपड्यांमुळे फारशी चर्चेत असते. यावेळी उर्फीच्या ड्रेसपेक्षा तिच्या कृतीचीच जास्त चर्चा होत आहे, त्यामुळे उर्फी खूप ट्रोलही होत आहे. तिचे काही नवीन फोटो समोर आले आहेत, जे सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. या फोटोंमध्ये उर्फीने काळ्या रंगाचा ड्रेस घातला आहे.
उर्फी जावेद नुकताच झलक दिखला जा 10 च्या एका कार्यक्रमात दिसली होती. या कार्यक्रमात ती काळ्या रंगाचा ड्रेस परिधान करुन आली होती.
उर्फी जावेदने या फोटोंमध्ये शॉर्ट ड्रेस घातलेला दिसत आहे. तो अतिशय टाइट ड्रेस आहे. जे चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे.
या ब्लॅक ड्रेसमध्ये उर्फी जावेद खूपच क्यूट दिसत आहे. तिचा हा ड्रेस तिला शोभून दिसत आहे.
या फोटोमध्ये उर्फी जावेद तिच्या ड्रेसमध्ये एक नोट ठेवताना दिसत आहे. ज्याची जोरदार चर्चा आहे.
जेव्हा उर्फी जावेदला समजले की ती नोट तिच्या ड्रेसमध्ये राहिली आहे, तेव्हा हे समजल्यानंतर तिला हसू आवरता आले नाही.
उर्फी जावेद या फोटोमध्ये तिच्या ड्रेसमधून नोट काढताना दिसत आहे. ही कृती चाहत्यांचे लक्ष तिच्याकडे वेधून घेत आहे. पण त्यामुळे उर्फी जावेद ट्रोल झाली.
उर्फी जावेदला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात आलं. सोशल मीडियावर लोक तिची खिल्ली उडवत आहेत.