मुंबई : सोशल मीडिया स्टार आणि इन्फ्लुएन्सर उर्फी जावेद सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियावर व्हिडिओ आणि फोटोंमुळे ती चाहत्यांच्या संपर्कात असते. आता तिचा नवीन व्हिडिओ आणि लुक समोर आला आहे. हा लुक पाहून चाहते घायाळ झाले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उर्फी जावेद रोज तिच्या नवनवीन लुक्समुळे चर्चेत असते. शनिवारी एका कार्यक्रमा दरम्यानचा तिचा फोटो आणि व्हिडिओ समोर आला आहे. या कार्यक्रमातील उर्फी जावेदचा लूक सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 


या कार्यक्रमात ग्लॅमर जगतातील अनेक स्टार्स हजर होते. मात्र उर्फीच्या स्टाईलसमोर सर्व कलाकार फिके वाटत होते.  उर्फीने काळी पारदर्शक साडी आणि बॅकलेस ब्लाउज घातला होता. यामध्ये ती तिचा फिगर फ्लॉंट करताना दिसत होती. तसेच व्हिडिओमध्ये ती साडी सावरताना दिसला आहे.



सोशल मीडीयावर तिचा हा व्हिडिओ प्रचंड व्हायरस होत आहे. हा व्हिडिओ अनेकांना आवड़ला आहे.या व्हिडिओवर कमेंट आणि लाईक्सचा पाऊस पडतोय.