मुंबई : बिग बॉस फेम उर्फी जावेद तिच्या सेक्सी स्टाईलमुळे सतत चर्चेत असते. ती आपल्या आऊटफिटवर वेगवेगळे प्रयोग करताना दिसते. पण आता जे उर्फीने केलंय ते पाहून तिचं डोकं फिरलंय का? असा प्रश्न अनेकजण विचारत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अलीकडेच उर्फी जावेदने असा ड्रेस डिझाईन केला आणि जो परिधान करून तिने केलेलं फोटोशूट सगळ्यांचं लक्षवेधून घेत आहे. उर्फीने यावेळी अगदी वेगळ्या पद्धतीने लूक केला आहे. तिने शर्ट उलटा घातला आणि त्याची बटणं लावलेली नाहीत.


उर्फी जावेदचा हा लूक पाहून चाहते सुद्धा चकीत झाले आहेत. उर्फी जावेद नेहमीच वेगळा आणि हटके लूक करण्याचा प्रयत्न करते. पण यावेळी मात्र ती ट्रोलिंगचा शिकार झाली आहे. 



उर्फीला असा लूक करणं महागात पडलं आहे. तिचे फोटो वेगाने व्हायरल होत आहेत.