`उरी- द सर्जिकल स्ट्राईक`ने पहिल्याच दिवशी जमवला 8 कोटींचा गल्ला
`उरी- द सर्जिकल स्ट्राईक` पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर केली धमाकेदार सुरुवात
मुंबई: अभिनेता विकी कौशलची मुख्य भूमिका असलेला 'उरी- द सर्जिकल स्ट्राईक' हा चित्रपट शुक्रवारी चित्रपटगृहात दाखल झाला. पहिल्याच दिवशी या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धमाकेदार सुरुवात केली. 'उरी' चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद पाहायला मिळाला.या चित्रपटानं पहिल्याच दिवशी 8 कोटींचा गल्ला जमवला.प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद त्याचप्रमाणे दमदार प्रमोशन आणि 'फस्ट डे फस्ट शो'ची कमाई पाहता अंदाज वरतवला जात आहे की, हा चित्रपट आठवड्याभरात 20-25 कोटींची पल्ला गाठेल.या चित्रपटातील विकी कौशल, यामी गौतम आणि मोहित रैना या मंडळीचा अभिनय प्रेक्षकांच्या पसंतीस पडलाय.या चित्रपटातील मिलिट्री ड्रामा लोकांना आकर्षित करुन गेला.
विशेष म्हणजे हा चित्रपटाचा बजेट 25 कोटी रुपये असून या चित्रपटातील अॅक्शन अगदी बिग बजेट चित्रपटांच्या अॅक्शनपेक्षा काही कमी नाही.सर्जिकल स्ट्राईकवर आधारित हा चित्रपट आदित्य धार यांनी दिग्दर्शित केला आहे तर निर्मितीची जबाबदारी रॉनी स्क्रूवाला यांनी उचलली आहे.भारतीय सेनेनं केलेल्याउरी सर्जिकल स्टाईकवर हा चित्रपट आधारलेला आहे..2016 साली जम्मू - काश्नीरमध्ये उरी हल्ल्यात दहशदवाद्यांनी भारतीय सैनिकांनवर हल्ला केला. 18 सप्टेंबर 2016 साली उरी मध्ये झालेल्या स्फोटात 19 भारतीय जवानांनी आपल्या प्राणाची आहुती दिली होती..या घटनेच्या 11 दिवसानंतर लगेचच भारतीय जवानांनी पाकिस्तानच्या ताब्यातील पीओके परिसरात सर्जिकल स्टाईक केला.