मुंबई : महाराष्ट्र ही छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमी आहे, अशा शब्दांत अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकर यांनी अभिनेत्री कंगना राणौत हिला चांगलेच खडसावले आहे. सिनेअभिनेत्री आणि आता काँग्रेसच्या कार्यकर्त्या असलेल्या ऊर्मिला यांनी ट्वीट करून कंगनावर तिखट शब्दांत हल्लाबोल चढवला आहे. याआधी केदार शिंदे, रितेश देशमुख यांनीही चांगलेच कंगनाला फटकारलेय.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कंगनाने गुरुवारी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना मुंबई शहराविषयी टिप्पणी केली होती. तिने म्हटले होते की, शिवसेना नेते संजय राऊत हे मला जाहीरपणे धमकी देत आहेत. मुंबईत परत येऊ नकोस, असे सांगत आहेत. काही दिवसांपूर्वी मुंबईच्या रस्त्यांवर माझ्यावर टीका करणाऱ्या ग्राफिटी काढण्यात आल्या होत्या. यानंतर आता मला जाहीर धमकी दिली जात आहे. मुंबई अचानक पाकव्याप्त काश्मीरसारखी का भासू लागली आहे, असा सवाल यावेळी कंगनाने उपस्थित केला होता.


कंगना हिने मुंबईला पाकव्याप्त काश्मीरची उपमा दिल्यामुळे आता सोशल मीडियावर तिच्यावर टीकेचा भडिमार सुरु झाला आहे. या वादात आता अभिनेता रितेश देशमुख यानेही उडी घेतली आहे. रितेश देशमुख याने कंगनाला थेट प्रत्युत्तर दिले नसले तरी त्याने सूचक अशी टिप्पणी केली आहे. 'मुंबई हिंदुस्तान है' असे त्याने म्हटले आहे. 



कंगनाला चित्रपट दिग्दर्शक केदार शिंदे यांनी चांगलेच उत्तर दिले आहे. केदार शिंदे यांनी ट्विट करताना म्हटले आहे, 'या मुंबईने कित्येक लोकांना डोक्यावर घेतले आणि कित्येकांना पायदळीही तुडवलं! जन्मभूमी कर्मभूमी आहे ही. आई आहे ही. खाऊन भरल्या ताटात…… #निषेध #kanganavirus