Urmila Nimbalkar : टेलिव्हिजन किंवा चित्रपटांमध्ये काम करणं हे महिलांसाठी किती सुरक्षितेचे आहे यावर अनेकदा चर्चा होताना दिसते आहे. त्यातून सध्या अशाच एका अभिनेत्रीच्या वक्तव्यानं सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. त्यातून यावेळी तिनं जे काही म्हटलंय त्यावरून आपल्या सर्वांचेच डोळे उघडतील हे मात्र खरं. ही अभिनेत्री एक लोकप्रिय मराठी अभिनेत्री आहे. तिनं मालिकांमधून कामं केली होती. परंतु यावेळी मात्र ती मालिका किंवा चित्रपटांतून काम करत नसून ती आता एक युट्यूबर आहे. तिच्या व्हिडीओजची चांगलीच चर्चा रंगलेली असते. सध्या तिनं अशाच एका व्हिडीओतून महिलांविषयींच्या सुरक्षितेतविषयी भाष्य केले असून यावेळी तिनं आपलेही काही वैयक्तिक अनुभव सांगितले आहेत. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर तिच्याच या व्हिडीओची चर्चा रंगलेली दिसते आहे. यावेळी तिनं महिलांना काही टीप्सही दिल्या आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आजकाल महिला सुरक्षितेतचा प्रश्न हा फारच महत्त्वाचा झाला आहे त्यातून फक्त मनोरंजन क्षेत्रातच नाही तर अन्य क्षेत्रातही महिला सुरक्षेविषयी गांभीर्यानं बोलणं गरजेचे आहे. सध्या ज्या अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे ती म्हणजे उर्मिला निबांळकर. तिनं शेअर केलेल्या अनुभवावरून मनोरंजन क्षेत्रातील महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा अधोरेखित झाला आहे. 


तिनं शेअर केलेल्या व्हिडीओत ती म्हणाली की, ''मी आज माझ्या खूप खासगी गोष्टी शेअर करणार आहे. मला अजून आठवतंय मुंबईला एक प्रोडक्शन हाऊस होतं. त्यांच्या ऑफिसमध्ये मी गेले होते. अतिशय लेजिटीमेट पाटी वगैरे लावली होती. फार मोठं असं ते प्रोडक्शन हाऊस होतं. एका मालिकेच्या ऑडिशनसाठी मी गेले होते. तिथे खूप गर्दी होती. बऱ्याच वेगवेगळ्या भूमिकांसाठी ऑडिशन सुरू होत्या. वेगवेगळ्या केबिन होत्या. मग मला तिथला निर्माता आतल्या खोलीत जाऊ या, असं म्हणाला. त्यावेळेस मी वयाने खूप लहान होते. पण मला असं झालं, आतल्या खोलीत का जायचं आहे? बाहेर सगळी गडबड चालू होती.''


''तरीसुद्धा मला का बरं आतल्या खोलीत बोलावलं असेल? इथे कॅमेरा आहे, इथे शूट आहे. मग माझ्याबरोबर असं काय बोलायचं आहे? त्यासाठी केबिन तर आहेच की? असे बरेच प्रश्न अंतर्मनात सुरू होते. मला काही कळलं नव्हतं. त्यानं मला गडबड करत आतल्या खोलीत जायचं आहे. म्हणून घेऊन गेला. मी सुद्धा गेले. मुळात अशावेळी आपल्याला कळतंही नाही काय करायचं. आत गेल्यानंतर त्यानं अशा पद्धतीने सुरुवात केली की, मला तुला पर्सनली बघायचं आहे, तुला काय करता येतं, अभिनय काय करता येतो, आणखी काय काय करता येतं. त्यानंतर तो बोलता बोलता उठला. हा आता मिठ्ठी मारणार हे मला कळलं तेच त्यावेळी माझं अंतर्मन बरोबर सांगत होतं.” असा थक्क करणारा अनुभव सांगतानाच ती पुढे म्हणाली. 


 “मी जेव्हा त्या खोलीकडे जात होती. तेव्हाच मला कळालं होतं की काहीतरी भयानक आहे. तरीही मी गेले. नशीबाने खोलीचा दरवाजा उघडाचं होता. त्यामुळे मी दरवाजाच्या बाजूलाच बसले होते. मला त्या खोलीत आतमध्ये जाऊन बसावं असंही वाटतं नव्हतं. काहीतरी वेगळं वाटतं होतं. माझं अंतर्मन मला बरोबर सांगत होतं. तो माणूस उठला आणि माझ्या जवळ येणार तितक्यात मी जोरदार तिथून पळ काढला. माझ्यावर प्रसंग येण्याच्या आत मी माझी बॅग उचलली. आता इथे माझं काहीही राहील तरी चालेल हा विचार करून मी तिथून पळाले. सातवा किंवा आठवा मजला असेल. तेवढे मजले मी जोरदार पळाले आणि एका गर्दीच्या ठिकाणी गेले. तिथे एक सिग्नल होता. तिथल्या फुटपाथवर जाऊन बसले.”


हेही वाचा - 'मारलं, की निमूट मरायचं असतं...' अतुल कुलकर्णी यांची महात्मा गांधींवरील कविता व्हायरल


''नंतर माझ्या कानावर आलं की त्या माणसाला अटक झाली. ते प्रोडक्शन हाऊस खोटं होतं. जो फ्लॅट होता, तो त्यांनी भाड्याने घेतला होता. तिथे सगळ्या फेक ऑडिशन होत्या. त्या माणसाने सगळ्यांना फसवलं होतं,” असा चित्तथरारक अनुभव तिनं शेअर केला.