मुंबई : बॉलिवूडची हॉट अभिनेत्री उर्वशी रौतेला नेहमी तिच्या बोल्ड अंदाजमुळे चर्चेत असते. बॉलिवूडची ही सुंदरी पुन्हा एकदा चर्चेत आहे ते तिच्या ड्रेसमुळे. उर्वशी जेव्हा एका अॅवॉर्ड शोमध्ये पोहोचली तेव्हा तिचा ड्रेस चर्चेचा विषय ठरला. उर्वशीने अॅवॉर्ड शोमध्ये जो ड्रेस घातला होता त्या ड्रेसचं वजन इतकं होतं की अनेकांना विश्वासच बसला आहे. उर्वशीने घातलेला गाउन हा जवळपास 80 किलोचा होता.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उर्वशीचा हा ड्रेस अर्चना कोचर यांनी डिझाईन केला आहे. उर्वशीने इंस्टाग्रामवर पोस्ट करत म्हटलं की, मला वाटतं की आज हा 80 किलोचा सुंदर गाऊन घालून मी बेशुद्ध होईल.' उर्वशीच्या या ड्रेसची सोशल मीडियावर देखील खूप चर्चा आहे. याआधी उर्वशी तिच्या साडीमुळे चर्चेत आली होती.