Urvashi Rautela sindoor : अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) गेल्या अनेक महिन्यांपासून इंटरनेट वॉरमुळे चर्चेत आहे. उर्वशी सध्या आगामी सिनेमे आणि सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत आहे. आता तुम्ही विचार करत असाल की तिने आता काय पोस्ट केलं आहे, ज्यामुळे अभिनेत्री पुन्हा तुफान चर्चेत आली आहे. यावेळी उर्वशीची नवीन  पोस्ट पाहिल्यानंतर तुम्हाला समजेल की लोक अभिनेत्रीला लग्नाचा सल्ला का देत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इन्स्टाग्रामवर उर्वशी स्वतःचा एक फोटो पोस्ट केला आहे. फोटोमध्ये उर्वशी लाल रंगाची साडी, गळ्यात मंगळसूत्र आणि अभिनेत्रीने सिंदून देखील लावला आहे.फोटो पोस्ट करत तिने कॅप्शनमध्ये 'में पड़ी प्रेमिका के लिए सिंदूर से प्रिय कुछ नहीं होता है…सारी रस्म रिवाज के साथ चाहिए, उम्र भर का साथ पिया तुमसे..” असं लिहीलं आहे. (Urvashi Rautela social  media post)



फोटो  आणि कॅप्शनमुळे अभिनेत्री सोशल मीडियावर चर्चेत आहे. अभिनेत्री सध्या ऑस्ट्रेलियात आहे. त्याच वेळी, ऋषभ पंत (rishabh pant) देखील सध्या भारतीय क्रिकेट संघ T20 विश्वचषक 2022 साठी ऑस्ट्रेलियात आहे. ऋषभ पंत पाठोपाठ उर्वशी ऑस्ट्रेलियात गेल्यामुळे रंगणाऱ्या चर्चांना उधाण आलं आहे. (Urvashi Rautela sindoor)


उर्वशी रौतेलाच्या फोटोला काही तासांत लाखो लाईक्स आले आहेत. तसेच युजर्सनी यावर कमेंट करायला सुरुवात केली आहे. एका यूजरने लिहिले आहे की, आता ऋषभ पंतला सोडा, टी-20 वर्ल्ड कपनंतर तुम्ही दोघं लग्नच करा. तर दुसऱ्या यूजरने लिहिलं की, ऋषभचं प्रकरण लग्नापर्यंत पोहोचलं. उर्वशी आणि ऋषभचं अभिनंदन... सध्या अभिनेत्रीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.