Urvashi Rautela समोरच मोठी दुर्घटना! केक कापताना उडाला आगीचा भडका अन् नंतर..., धक्कादायक व्हिडीओ समोर
Urvashi Rautela Viral Video : उर्वशी रौतेलाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत उर्वशी समोर जे काही झालं ते पाहून सगळ्यांना आश्चर्य झालं आहे. इतकंच काय तर उर्वशीला स्वत: मोठा धक्का बसला आहे. उर्वशीनं स्वत: हा व्हिडीओ शेअर केला आहे.
Urvashi Rautela Viral Video : बऱ्याचवेळा आपण असे अनेक व्हायरल व्हिडीओ पाहतो, ज्यात पाहतो की केक कट करण्याआधी कॅन्डल पेटवर असताना मोठी आग लागते. कधी कोणाच्या केसाला ही आग लागते तर कधी बर्थ डे गर्ल किंवा बर्थ डे बॉयला आग लागते. त्यांचे व्हिडीओ आपण पाहतो. त्यातून आपण सतर्क होतो. दरम्यान, नुकताच अभिनेत्री उर्वशी रौतेलाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यावेळी अशीच घटना ही उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) समोर झाली आहे. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून उर्वशीनं देखील शेअर केला आहे.
हा व्हिडीओ उर्वशीनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीवरून शेअर केला आहे. या व्हिडीओत उर्वशीला पाहण्यासाठी झालेली गर्दी यात दिसत आहे. त्यानंतर उर्वशी केक कापण्यासाठी उभी राहते. त्यावेळी देखील उर्वशी भोवती गर्दी झाली होती. अशात एक मुलगी केकवर मेनबत्ती लावण्यासाठी पुढे आली. ती मेनबत्ती लावत असताना अचानक आगीचा भडका उडाला आणि घाबरून ती मुलगी मागे झाली. खरंतर जेव्हा आगीचा भडका उडाला तेव्हा त्या मुलीच्या केसांना भडका लागून केस जळतात. त्यावेळी उर्वशी देखील घाबरते. ती देखील आश्चर्य चकीत होते. नशीबानं त्या मुलीच्या कपड्यांनी पेट घेतला नाही आणि हे सगळं थोडक्यात आटपलं. तरी सुद्धा त्या मुलीला नंतर रुग्णालयात घेऊन जाण्यात आलं. त्या मुलीला रुग्णालयात घेऊन गेल्यानंतर उर्वशीनं तिला फोन केल्याचे रिपोर्ट्समध्ये म्हटले आहे. इतकंच काय तर उर्वशीनं तिच्या तब्येतीची विचारपूस देखील केली.
दरम्यान, उर्वशीचे आणखी काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या व्हिडीओत उर्वशीला पाहण्यासाठी लोक गर्दी करताना दिसतात. इतकंच काय तर अनेक लोक तिच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी धावपळ करताना दिसतात.
उर्वशी ही गेल्या अनेक दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. तिचं आणि भारतीय क्रिकेटर ऋषभ पंत या दोघांमधील वाद तर सगळ्यांना माहितच आहे. त्या दोघांच्या चाहत्यांमध्ये देखील त्यावरून वाद होते. अशात उर्वशीनं काही दिवसांपूर्वी तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये एक तरूणी असून तिच्या हातात एक बोर्ड होता. ती मुलगी स्टेडियममध्ये असल्याचे दिसत आहेत. तर त्या बोर्डवर लिहिलं होतं की बरं झालं उर्वशी इथं नाही. त्या मुलीचा फोटो शेअर करत उर्वशीनं कॅप्शनमध्ये का असं लिहिलं होतं.