मुंबई : बॉलिवूडची स्टाईलिश आणि बोल्ड अभिनेत्री उर्वशी रौतेला सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. नेहमी अभिनेत्रीचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. उर्वशी नेहमी आपले किंमती ड्रेस आणि ज्वेलरीमुळे चर्चेत असते. मात्र यावेळी एक असा व्हिडिओ व्हायरल होतोय ज्यात उर्वशी रौतेला कोणत्या लग्जरी कारमध्ये नाही तर स्कूटी चालवताना दिसतेय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोलिसांनी मागितलं ड्राईव्हिंग लाईसंन्स
तुम्हाला पण ऐकून धक्का बसला ना? मात्र खरच या व्हिडिओमध्ये करोडोंचे आऊटफिट घालणारी उर्वशी रौतेला सर्वसामान्यांसारखी स्कूटीची सवारी घेताना दिसतेय. मात्र एवढ्यातच एक पोलिस तिला ड्राईव्हिंग लायसन्स विचारतात.  ज्यांनंतर ती थोडी घाबरताना दिसतेय. ती आपले एक्सप्रेशन असे देते जसं की, तिच्याकडे गाडीचे कागदपत्रच नाहीयेत. मात्र उर्वशी आपल्या गाडीचे कागदपत्र दाखवून गोड स्माईल देते. तिचा हा संपूर्ण व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


उर्वशीचा व्हिडिओ व्हायरल
हा व्हिडिओ आत्ताचा नसून जुना आहे. स्वत: उर्वशीने इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केला होता. आता अभिनेत्रीचा हा व्हिडिओ तिच्या फॅनपेजवर शेअर केला आहे. ज्यानंतर हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ वेब सीरीज 'इंस्पेक्टर अविनाश'च्या शूटींग दरम्यानचा आहे. ज्यामध्ये उर्वशी, रणदीप हुड्डासोबत दिसली होती.