उषा उत्थुप यांच्या पतीचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन, फार खास आहे त्यांची लव्ह स्टोरी
Usha Uthup husband Jani Chacko Uthup Passes : उषा उत्थुप यांच्या दुसऱ्या पतीचे हृदयविकाराच्या झटक्यानं निधन
Usha Uthup husband Jani Chacko Uthup Passes : लोकप्रिय गायिका उषा उत्थुप यांचे पती जानी चाको उत्थुप यांचे सोमवारी 8 जुलै रोजी कोलकातामध्ये निधन झाले. त्यांनी वयाच्या 78 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या कुटुंबानं ही माहिती दिली आहे. कुटुंबानं सांगितलं की जानी यांना घरी टिव्ही पाहत असताना अस्वस्थत वाटू लागलं. त्यांच्या जवळच्या लोकांनी सांगितलं की त्यांना जवळच्या रुग्णालयात घेऊन जाण्यात आलं. मात्र, तिथे पोहोचल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. कुटुंबातील लोकांनी सांगितलं की हृदयविकाराचा झटका आल्यानं त्यांचे निधन झाले.
उषा उथूप यांचं पहिलं लग्न रामू अय्यर यांच्याशी झालं होतं. पण त्यांच्या लग्नाला पाच वर्ष झाली आणि त्यांच्यात सगळं अस्थिर होतं. रामू, उषा यांना संगीतात करिअर करण्यासाठी प्रोत्साहित करत होते. त्यांना वेगवेगळ्या इव्हेंटला घेऊन जायचे. पण त्यांच्यात पती-पत्नीसारखे संबंध नव्हते. एकदा जेव्हा त्या पहिल्या पतीसोबत कोलकाता कार्यक्रमात गेल्या होत्या. तेव्हाच त्यांची आणि जानी यांची भेट झाली.
'द क्वीन ऑफ इंडियन पॉप: द ऑथराइज्ड बायोग्राफी ऑफ उषा उत्थुप' जी विकास कुमार झा यांनी लिहिली आहे आणि त्याला सृष्टी झा यांनी ट्रान्सलेटे केलं असून त्यात सांगण्यात आलं आहे की 1969 मध्ये जेव्हा उषा यांना ट्रिंकस यांच्यासोबत गाणं गाण्याचा तीन आठवड्यांचा एक कॉन्ट्रॅक्ट मिळाला होता. त्यासाठी त्या रामू यांच्यासोबत कोलकाताला गेल्या होत्या. त्या जेव्हा संध्याकाळी तिथे गात होत्या त्यावेळी तिथे जानी देखील उपस्थित होते. ते उषा यांना पाहत होते. ते ख्रिश्चन होते तर उषा या हिंदू ब्राह्मण. रामू आणि जानी हे एकमेकांशी बोलायचे.
उषा यांचे दुसरे पती जानी यांनी रामू यांना एका चायनीझ रेस्टॉरंटमध्ये बोलावलं. जिथे त्यांना सांगण्यात आलं की मला उषाला नक्की काय वाटतं हे माहित नाही पण माझं तिच्यावर प्रेम आहे. हे रामू यांनी उषाला सांगितलं. पण या सगळ्या आधी जेव्हा जानी घरी आले होते तेव्हा रामू यांना रागात त्यांच्या तोंडावर दरवाजा बंद केला होता. त्यानंतर रामू यांनी उषा यांना विचारलं की जानीनं जे सांगितलं ते सत्य आहे का? तुझ्या मनात त्याच्यासाठी काही भावना आहेत का? तेव्हा घाबरत घाबरत उषा यांनी होकार दिला. अशात रागात रामू यांना भिंतीवर प्लेट फेकली आणि झोपायला गेले. मात्र, उषा सकाळ होईपर्यंत रडतच होत्या. त्यांना भीती वाटत होती की लोक काय म्हणतील. त्यानंतर उषा आणि रामू यांच्यात दुरावा येऊ लागला. त्यानंतर उषा आणि जानी यांच्या भेटी-गाठी वाढू लागल्या. काही काळानंतर त्यांनी लग्न केलं.