मुंबई : आज (शनिवार) गूगलने सिनेनिर्माते व्ही शांताराम यांना श्रद्धांजली देण्यासाठी खास गुगल डूडल बनवले आहे.  


आज व्ही शांताराम यांची ११६ वी जयंती


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज व्ही शांताराम यांची ११६ वी जयंती आहे. यानिमित्त त्यांच्या व्यक्तिमत्त्वाशी निगडीत काही खास पैलूंचा समावेश गुगल डूडलमध्ये करण्यात आला आहे. 


 चित्रपटांचा गुगल डूडलमध्ये समावेश


 १९५० च्या दशकात व्ही शांताराम यांच्या गाजलेल्या चित्रपटांचा गुगल डूडलमध्ये समावेश करण्यात आला आहे. अमर भूपाळी, दो आखे बारा हात आणि नवरंग या तीन चित्रपटांतील खास गोष्टींचा गूगल डुडलमध्ये समावेश करण्यात आला आहे.  
  
  हिंदी,मराठी सिनेसृष्टीत दर्जेदार कलाकृतींची निर्मिती करण्यामध्ये व्ही शांताराम यांचा महत्त्वाचा वाटा आहे. सुमारे ५० वर्ष व्ही शांताराम सिनेसृष्टीमध्ये कार्यरत होते. १९०१ साली कोल्हापूरात व्ही. शांताराम यांचा जन्म झाला. त्यांनी १९२७ साली 'नेताजी पालकर' हा पहिला चित्रपट दिग्दर्शित केला. 


व्ही शांताराम अ‍ष्टपैलू  व्यक्तिमत्त्व 



व्ही शांताराम हे दिग्दर्शक, अभिनेते, एडिटर, निर्माते अशा चित्रपटाशी निगडीत सार्‍याच पैलूमध्ये निष्णात होते. अनेक सामाजिक विषयांवर भाष्य करणार्‍या अर्थपूर्ण कलाकृतींमध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे. 
  
डॉ. कोटणीस की अमर कहानी, अमर भूपाळी, झनक झनक पायल बाजे, दो आखे बारा हात, नवरंग, पिंजरा असे एकापेक्षा एक दर्जेदार सिनेमे त्यांनी बनवले.