मुंबई : 'फू बाई फू', ' शेजारी शेजारी...' अशा विनोदी मालिकांमधून रसिकांच्या भेटीला आलेला वैभव मांगले आता हिंदी मालिकेमधून रसिकांच्या भेटीला येणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 मराठी सिनेमा आणि मालिकामधून वैभवने आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली. काकस्पर्श, टाईमपास या चित्रपटातील वैभवाच्या कामाचे कौतुक झाले. यानंतर आता वैभव आता हिंदी मालिकांमध्ये वळला आहे. 


 साई बाबांच्या आयुष्यावर आधारित  हिंदी  मालिकेत वैभव लवकरच झळकणार आहे. सोनी टिव्हीवर 'मेरा साई' ही नवी मालिका सुरू होणार आहे. साईबाबांच्या आयुष्यात आलेल्या अनेक व्यक्तींचा या मालिकेत समावेश केला जाणार आहे. त्यापैकी एक भूमिका वैभव साकारणार आहे. 


 'कुलकर्णी' नावाच्या एका व्यक्तीला साई बाबांच्या दैवत्त्वावर नेहमी संशय असायचा. ही ' कुलकर्णी' नामक भूमिका वैभव साकारणार आहे. 
 वैभवच्या या भूमिकेला थोडा नकारात्मक रंग आहे. त्यामुळे आपल्या खास कोकणी अंदाजामध्ये प्रेक्षकांना खळखळून हसवणारा वैभव आता छोट्या पडद्यावर थोड्या हटके भूमिकेत दिसणार आहे.