मुंबई : अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) ही लोकप्रिय मराठी सेलिब्रिटींपैकी एक आहे. प्राजक्तानं काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत लोकप्रिय मराठमोळा अभिनेता वैभव तत्ववादी (Vaibhav Tatwawadi) हा तिचा क्रश असल्याचे म्हटलं होतं. 'कॉफी आणि बरंच काही' या चित्रपटामुळे प्राजक्ताला तो आवडू लागला होता. इतकंच काय तर तिनं थेट तिच्या आईला वैभव तुला जावई म्हणून चालेल का? असा प्रश्न देखील विचारला होता. प्राजक्तानं काही दिवसांपूर्वी प्लॅनेट मराठीला दिलेल्या मुलाखतीत वैभव तत्ववादी हा तिचा क्रश होता असा खुलासा केला होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यानंतर वैभवने देखील प्राजक्ताच्या या वक्तव्यावर वक्तव्य करत म्हटलं की, मला प्राजक्ताने स्वत: मुलाखतीतील तो व्हिडीओ पाठवला होता. मी तुझ्याबद्दल असं बोलली आहे, हे तिने मला सांगितलं. एका सुंदर मुलीने क्रश असल्याचं सांगितल्यावर एका मुलाच्या ज्या भावना असतील. त्याच माझ्या होत्या', असं वैभव म्हणाला. यानंतर या दोघांबाबत अनेक अफवाही उठल्या होत्या मात्र नुकताच प्राजक्ताने वैभवसोबतचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. 


मात्र प्राजक्ताचा हा व्हिडीओ हा प्रमोशनल व्हिडीओ आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. नुकताच प्राजक्ता आणि वैभवचा नवा सिनेमा तिन अडकून सिताराम हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. याच सिनेमाच्या प्रमोशनचा हा व्हिडीओ आहे. जो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तीन अडकून सिताराम या सिनेमाची टीम 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या शोमध्ये प्रमोशनला गेली होती. यावेळी तिथे हा व्हिडीओ शूट करण्यात आला. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


अनेकांनी प्राजक्ताच्या या व्हिडीओवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे. एका चाहत्याने कमेंट करत लिहींय की, अरे यार त्याच्या कडे कोणी लक्ष द्या . तर अजून एकाने लिहीलंय की, लग्न करून टाक वैभवशी.. झक्कास जोडी आहे. तर अजून एकाने लिहीलंय की, सर्वांची लाडकी बहारदार अभिनेत्री प्राजक्ता माळी. तर अजून एकाने कमेंट करत लिहीलंय की, फायनली तुझा क्रश. तर अनेकजण प्राजक्ताच्या या व्हिडीओवर फायर ईमोजी आणि हार्ट ईमोजी शेअर केले आहेत.