Vaibhavi Upadhyaya च्या अपघाती मृत्यूनंतर होणाऱ्या पतीची काळीज पिळवटून टाकणारी पोस्ट
Vaibhavi Upadhyaya : वैभवी उपाध्यायचं 23 मे रोजी रस्ता अपघातात निधन झाले. तिच्या निधनानंतर सगळ्यांना मोठा धक्का बसला आहे. तर वैभवीचा होणारा पती यांनं सोशल मीडियावर एक भावूक पोस्ट शेअर केली आहे. त्याृनं शेअर केलेली ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे.
Vaibhavi Upadhyaya : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री वैभव उपाध्यायनं बॉलिवूडमध्येही कमालीचे काम केले आहे. काही दिवसांपूर्वी वैभवी उपाध्यायचे निधन झाले. एका अपघातात वैभवीच्या कुटुंबानं तिला गमावलं. वैभवी यावेळी तिच्या होणाऱ्या नवऱ्यासोबत होती. फक्त तिचं कुटुंब नाही तर तिचा होणारा नवरा आणि तिचे चाहते देखील ही गोष्टी स्विकारू शकत नाहीत की ती आता त्यांच्या सोबत नाही. या दरम्यान तिचा होणारा नवरा जय गांधीनं सोशल मीडिया अकाऊंटवरून एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. जय गांधीनं शेअर केलेली ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे.
वैभवीचा होणारा नवरा जय गांधीनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून तिच्यासोबत एक फोटो शेअर करत म्हणाला, "जो पर्यंत आपण परत भेटत नाही... ते अप्रतिम क्षण जेव्हा आपण सोबत असायचो, ते पुन्हा एकदा चेहऱ्यावर हसू आणतील आणि जर मला तुझ्यासोबत थोडा वेळ मिळाला तर... जसं आपण आधी बसायचो आणि आधी बोलायचो. तू माझ्यासाठी खूप महत्त्वाची होतीस आणि राहशील ही. या गोष्टीचा मला नेहमीच त्रास होईल किंवा वाईट वाटेल की तू माझ्यासोबत आता नाहीस. पण तू माझ्या हृदयात कायम स्वरूपी राहशील, जो पर्यंत आपण पुन्हा भेटत नाही. तुझ्या आत्म्याला शांती मिळो." जयनं शेअर केलेली ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली असून अनेक लोक यावेळी भावूक झाले आहेत.
रिपोर्ट्सनुसार, जय आणि वैभवी यांनी याच वर्षी फेब्रुवारी महिन्यात साखरपुडा केला होता आणि डिसेंबर महिन्यात त्याचं लग्न होणार होतं. त्यांच्या लग्नाच्या तयारीला आतापासून सुरुवात झाली होती. वैभवी तिच्या सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी डोंगर असेल अशा ठिकाणी जाणं पसंत करायची. तर काही दिवसांपूर्वीच जय त्याच्या एका ट्रिपसाठी हिमाचलला गेला होता. वैभवीनं त्यांच्या या ट्रिपचे काही फोटो आणि व्हिडीओ देखील शेअर केले होते.
हेही वाचा : आई बंगाली- वडील जर्मन मग मुस्लिम आडनाव का लावते Dia Mirza?
23 मे रोजी ते दोघे कुल्लू हे गाडीनं फिरायला जात होते, तेव्हाच एका ट्रकनं येऊन त्यांना धडक मारली. त्यानंतर 50 फूट खाली दरीत गाडी पडली. या अपघातात वैभवीचे निधन झाले तर जयला काही जखमा झाल्या आहेत.
वैभवीच्या कामाविषयी बोलायचे झाले तर तिनं साराभाई वर्सेस साराभाई या मालिकेत काम केले होते. या मालिकेत तिनं जॅसमीन मवानी ही भूमिका साकारली होती. याच भूमिकेतून वैभवीनं सगळ्या चाहत्यांवर तिची जादू केली आणि सगळ्यांची मने जिंकली.