मुंबई : आजच्या चढा-ओढीच्या जीवनात फक्त पती-पत्नीचं नाही तर कोणतही नात शेवटपर्यंत टिकून राहणं फार कठीण आहे. कलाविश्वात तर कधी कोणचं ब्रेकअप होईल आणि कोणाचं नाव कोणासोबत जोडलं जाईल... या गोष्टीचा काही पत्ता लागणार नाही. पण बॉलिवूडमध्ये असे काही जोडपे आहेत, जे खऱ्या प्रेमाचं प्रतिक आहे. त्यातील एक म्हणजे अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जिनिलिया देशमुख. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बॉलिवूडमधील ‘क्यूट कपल’ म्हणून जिनिलिया आणि रितेश देशमुख या जोडीकडे पाहिले जाते. (Riteish Genelia love story) त्यांचे बॉडिंगही चांगले आहे. अनेकवेळा दोघेही सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत असतात.



दरम्यान, आज व्हॅलेंटाईन डे असल्यामुळे दोघांच्या लग्नाचे कधीही न पाहिलेले फोटो व्हायरल होत आहेत. रितेश आणि जिनिलियाचं लग्न हिंदू आणि ख्रिश्चन पद्धतीत परा पडलं.  चर्चमधील त्यांच्या लग्नाचे फोटो तुफान व्हायरल होत आहेत. 


त्यांच्या या फोटोंवर चाहत्यांच्या शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. बऱ्याच वर्षांची मैत्री आणि त्यानंतर लग्न अशी त्यांची प्रेमकहाणी सगळ्यांन माहिती आहे. या जोडीचा संसार गुण्यागोविदाने सुरु आहे. त्यामुळे त्यांच्या प्रेमाची चर्चा नेहमी असते.


रितेश आणि जिनिलिया 2012 मध्ये विवाहबंधनात अडकले. त्यांना आता दोन छान मुले आहेत. बॉलिवूडच्या सर्वांत आवडत्या कपल्समध्ये आजही या दोघांचे आघाडीने घेतलं जाते.