मुंबई : बॉलिवूडची झगमगती दुनिया फार वेगळी आहे. कधी पूर्ण दुनिया एखद्या कलाकाराला डोक्यावर उचलून घेते, तर काही दिवसांनंतर मात्र त्याचं  कलाकाराला एकट्यापणाची जाणीव होते. असचं काही झालं आहे बॉलिवूडच्या एक प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत. शेवटच्या क्षणी ही अभिनेत्री एवढी एकटी पडली की, तिला मृत्यूनंतर चार खांदे देण्यासाठी देखील कोणी नव्हतं... 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज आपण ज्या अभिनेत्रीबद्दल बोलत आहोत, तिचे जनरल वॉर्डमध्ये निधन झाले होते. 'हमराज' सिनेमातून एका रात्रीत स्टार झालेली अभिनेत्री विमी.. सुरूवातीला चारही बाजूला फक्त आणि फक्त चाहत्यांची गर्दी... पण काही वर्षांनी मात्र फक्त एकटेपणा... 


60 च्या दशकांत बॉलिवूडवर विमीचं राज्य होतं. सुनील दत्त आणि राजकुमार यांसारख्या अभिनेत्यांसोबत त्यांनी अनेक हिट सिनेमे दिले. विमी यांचा जन्म 1943 मध्ये एका पंजाबी कुटुंबात झाला. त्यांनी मुंबईच्या कॉलेज शोफियामधून ग्रॅज्युएशन पूर्ण केले 


शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी लग्न केलं. कोलकाता येथील व्यापारी शिव अग्रवाल यांच्याशी विमी यांचं  लग्न झालं. विमीला अभिनेत्री बनवण्याचे पूर्ण श्रेय संगीत दिग्दर्शक रवी यांना जातं. विमी मुंबईत पोहोचल्यावर रवीने त्यांची ओळख दिग्दर्शक बी. आर. चोप्रा यांच्यासोबत करून दिली. 


चोप्रा यांनी 'हमराज' सिनेमात विमी यांना मुख्य अभिनेत्री म्हणून साइन केले. या सिनेमात राजकुमार, सुनील दत्त आणि मुमताज यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका होत्या. 'हमराज' सुपरहिट झाला आणि विमी रातोरात सुपरस्टार झाल्या.


'हमराज' रिलीज होऊन अवघ्या 10 वर्षांनी विमीची प्रकृती वाईट झाली होती. वस्त्रोद्योगातही त्यांना इतका तोटा सहन करावा लागला की त्यांच्यावर कर्ज वाढत गेले. पतीपासून विभक्त झाल्यानंतर त्या डिप्रेशनमध्ये गेल्या. 


त्यांचे सर्व सिनेमे बॉक्स ऑफिसवर सुपरहिट होत असताना, त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात हळूहळू सर्व काही उद्ध्वस्त होत होतं. यामुळे त्यांनी पतीपासून घटस्फोट घेतला.



डिप्रेशनमध्ये विमीने दारू पिण्यास सुरुवात केली. ज्याचा वाईट परिणाम त्यांच्या लीवरवर झाला. मुंबईत राहून त्यांनी सिनेमात काम करण्यासाठी आलिशान घरही घेतलं होतं. त्यावेळी त्यांच्याकडे अनेक महागड्या गाड्या देखील होत्या. पण परिस्थिती अशी बनली की त्यांच्याकडे उपचारासाठी देखील पैसे नव्हते.


आयुष्याच्या शेवटच्या दिवसात त्यांना मुंबईतील नानावटी हॉस्पिटलच्या जनरल वॉर्डमध्ये दाखल करण्यात आलं. 22 ऑगस्ट 1977 रोजी नानावटी रुग्णालयातचं विमी यांचा मृत्यू झाला. 


मृत्यूनंतर त्यांना खांदा देणारं देखील कोणी नव्हतं. मृत्यूनंतर त्यांचा मृतदेह हातगाडीवर स्मशानभूमीत न्यावा लागला... असं देखील अनेक जण सांगतात.