मुंबई : अभिनेता वरूण धवन आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचं आवाहन केलंय. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी ग्रीन गणेश ही मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेला बळ देण्यासाठी वरूण धवन आणि अनुष्का शर्मा यांनी मुंबईत एका मॉलला भेट देऊन मोहिमेचं स्वागत केलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Celebrating this auspicious occasion with a beautiful eco-friendly Bappa made with Dhaaga  #GaneshChaturthi @Varun_dvn pic.twitter.com/AQOLK7je7e



आज सर्वत्र गणरायाचंच राज्य दिसून येतंय. गणेशमूर्ती घरी घेऊन जाण्यासाठी लगबग सुरू आहे. ढोलताशांच्या गजरात बाप्पाला घरी घेऊन जात आहेत. एका भाविकाने आपली चारचाकी गाडी बाप्पाच्या आगमनासाठी सुंदर सजवली होती. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याकडे भाविकांचा कल आहे.