Varun Dhawan feel Emotional : बॉलिवूड अभिनेता वरुण धवन (varun dhawan) त्याच्या प्रोफेशनल आघाडीमुळे नेहमीच चर्चेत असतो. त्याचबरोबर तो सोशल मीडियावरही चाहत्यांशी जोडलेला असतो. आता देखील अभिनेता 'भेडिया' (bhediya) सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. नुकताच सिनेमाच्या प्रमोशनसाठी (bhediya trailer) अभिनेता एका कार्यक्रमात पोहोचला. यावेळी अभिनेत्याने त्यांच्या जीवनातील अशा एका व्यक्तीची आठवण काढली जी 26 वर्ष एकत्र राहून वरुणला एकटं सोडून गेली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कार्यक्रमात वरुणाला कोरोना काळातील असा एक अनुभव ज्यामुळे तुमच्यात बदल झाले. यावर उत्तर देताना अभिनेता भावुक झाला. 'मी आजपर्यंत ही गोष्ट कोणासोबत शेअर केली नाही. अशी एक व्यक्ती होती जी माझ्यासोबत 26 वर्ष होती आणि अचानक मला सोडून गेली...'


वरुण आयुष्यातील 'ती' खास व्यक्ती
अभिनेता पुढे म्हणाली, 'मनोजचं निधन माझ्या डोळ्यासमोर झालं. कोविडनंतर त्याची प्रकृती सुधारली. पण हृदय विकाराचा झटका आल्यानंतर मनोजचं निधन झालं. मनोजच्या निधनाने मला प्रचंड दुखः झालं.'


'या परिस्थितीतून सावरण्यासाठी अनेकांनी मला सल्ला देखील दिला. पण माझ्यासाठी ते अशक्य होतं. आशी व्यक्ती जी माझ्यासोबत 26 वर्ष होती. जिच्यामुळे मी आज याठिकाणी आहे. आज देखील त्याची आठवण आल्यावर माझ्या डोळ्यात पाणी येतं....' अशी भावना अभिनेत्याने सिनेमाच्या प्रमोशन दरम्यान व्यक्त केली. 


'भेडिया' सिनेमा प्रेक्षकांनी का पाहावी? 
प्रेक्षकांच्या सिनेमाच्या  VFX चा अभिमान वाटेल. यासाठी प्रचंड पैसै मोजावे लागले आहेत. सिनेमात प्रेक्षकांनी कार्टून टाईप कॅरेक्टर दिसणार नाही. जेव्हा लोक वाईट VFX पाहतात तेव्हा मला ते आवडत नाहीत. वरुणने सांगितले की, सिनेमा चांगला आहे आणि प्रेक्षकांना तो नक्क आवडेल.


वरुण धवन आणि क्रिती सेनन यांचा 'भेडिया' सिनेमा 25 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. भेडिया सिनेमाची कथा कॉमेडी हॉरर भोवती फिरतानी दिसणार आहे. सिनेमात वरुण भास्कर चोप्राच्या भूमिकेत दिसणार आहे तर, क्रिती सेनॉन (Kriti Senon) डॉक्टर अनिका कोठारीच्या भूमिकेत आहे.