मुंबई : बॉलिवूड अभिनेता वरुण धवन सध्या ‘भेडिया’ या त्याच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. भेडिया या चित्रपटात वरुण धवनसोबत अभिनेत्री क्रिती सेनन मुख्य भूमिकेत आहे. त्यांच्या या चित्रपटाच्या ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. सध्या वरुण हा भेडियाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. दरम्यान, एका मुलाखतीत वरुणनं एक मोठा खुलासा केला आहे. वरुणनं नुकतंच सांगितलं की तो वेस्टिब्युलर हायपोफंक्शन (Vestibular Hypofunction) नावाच्या दुर्मिळ आजाराशी झुंज देत आहे. या आजारात व्यक्ती शरीराचे संतुलन गमावते.


वरुण धवन झाला गंभीर आजाराचा शिकार


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वरुणनं नुकतीच 'इंडिया टुडे'ला मुलाखत दिली. यावेळी वरुण म्हणाला, 'त्याच्या आधीच्या जुग जुग जिओ' या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान त्याने स्वत:वर खूप प्रेशर दिला होता, ज्यामुळे त्याच्यावर खूप वाईट परिणाम झाला. वरुण म्हणाला, 'आम्ही दार उघडतो तेव्हा आम्हाला वाटत नाही की आम्ही पुन्हा त्याच रॅट रेसमध्ये पडू. इथे असे किती लोक आहेत जे बोलतील की करोनाच्या साथीच्या रोगानंतर बदलले आहेत. मी लोकांना मेहनत करताना पाहिले आहे, मी स्वतः माझ्या 'जुग जुग जिओ' चित्रपटात खूप मेहनत करायला सुरुवात केली आहे. असं वाटलं की आपण निवडणूक लढवत आहोत, माहित नाही का, पण मी स्वतःवर खूप दबाव आणला होता.


वरुण पुढे म्हणाला, 'मी आता स्वत:ला थांबवले आहे, मला काय झालं ते मला माहीत नाही. मला वेस्टिब्युलर हायपोफंक्शनचा त्रास होत आहे ज्यामुळे सामान्यतः आपला तोल जातो. आम्ही फक्त एक शर्यतीत आहोत आणि याविषयी कोणी का विचारत नाही. मला वाटतं की आम्ही येथे काही तरी कारणासाठी आहोत. मी अजून स्वत:ला शोधत आहे आणि आशा आहे की तुम्हीही स्वत:ला शोधाल...'


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


वेस्टिब्युलर हायपोफंक्शन हा कानाचा आजार आहे. या आजारात कानाच्या आतील भागावर परिणाम होतो, जो शरीराचा समतोल राखण्याचे काम करतो. जर ते योग्यरित्या कार्य करत नसेल तर, एखाद्या व्यक्तीला चक्कर येऊ लागते आणि त्याचा तोल जातो.