मुंबई : सध्या अभिनेता वरूण धवन खूपच आनंदामध्ये आहे. यामागील  कारणही तितकेच खास आहे. हॉंगकोंगमधील मादाम तुसाद वॅक्स म्युझियममध्ये त्याचा मेणाचा पुतळा उभारण्यात आला आहे.  


 वरूण धवनने रचला विक्रम   


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 हॉंगकॉंगच्या मादाम तुसाद वॅक्स म्युझियममध्ये मेणाचा पुतळा उभारल्यानंतर वरूण आई वडीलांसह तेथे पोहचला होता. तेथे त्याने खास अंदाजामध्ये डांसही केला.  हॉंगकॉंगमधील मादाम तुसाद वॅक्स म्युझियममध्ये मेणाचा पुतळा उभारला गेलेल्या कलाकारांमध्ये वरूण हा सगळ्यात लहान  कलाकार ठरला आहे.  


 
 मेणाचा पुतळा 'या' कारणासाठी खास 


 मेणाच्या पुतळ्याचे फोटो शेअर करताना वरूण धवनने खास गोष्ट शेअर केली आहे. यामध्ये त्याने पुतळ्यावर घातलेले जॅकेट खास असल्याचे सांगितले आहे. 
 2015 साली 'एबीसीडी 2' मध्ये घातलेले जॅकेट या पुतळ्यावर घालण्यात आले आहे. याबाबतची पोस्ट शेअर करताना त्याने कोरिओग्राफर रेमो डिझुजालाही टॅग केले आहे. 




 
 'एबीसिडी 2' या चित्रपटाचे दिग्दर्शन रेमो डिझुजाने केले होते. तर वरूण सोबत या चित्रपटामध्ये श्रद्धा कपूर झळकली होती. 


 
खास पोज 


वरूण धवन 'हम्प्टी शर्मा की दुल्हनिया' या चित्रपटातील 'Saturday-Saturday'गाण्यातील खास पोजमध्ये दिसला. याच स्टाईलमध्ये त्याचा मेणाचा पुतळादेखील बनवण्यात आला आहे. 


लवकरच वरूण धवन ' अक्टुबर' या चित्रपटामध्ये झळकणार आहे. सोबतच अनुष्का शर्मा ' सुई धागा' हा त्याचा आगामी चित्रपट रसिकांच्या भेटीला येणार आहे.