मुंबई : कलाकाराचं फोटो काढण्यासाठी प्रत्येक जण उत्सुक असतो. मग तो चाहता असो किंवा फोटोग्राफर. सेलिब्रिटींचे फोटो कॅमेऱ्यात टिपण्यासाठी प्रत्येक फोटोग्राफर प्रयत्नांची पराकाष्ठा करत असतो. अशीच धडपड करताना एका फोटोग्राफरला चांगलाच फटका बसला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अभिनेता वरूण धवनचा फोटो काढताना एका फोटोग्राफरला चांगला फटका बसला आहे. गुरूवारी रात्री वरूण धवन आणि त्याची गर्लफ्रेंड नताशा दलाल निर्माता शशांक खेतानच्या वाढदिवसानिमित्त गेले होते. यावेळी फोटो काढत असताना एका फोटोग्राफरच्या पायावरून वरूण धवनची कार केली. या अपघाताचा व्हिडिओ समोर आला आहे. 



पायावरून गाडी गेल्यावर फोटोग्राफरचा किंचाळण्याचा आवाज आला. यावेळी वरूण धवनने लगेच ड्रायव्हरला गाडी थांबवण्यास सांगितल. यानंतर वरूण धवन फोटोग्राफरवर चिढताना दिसत आहे. वरूण म्हणतो,'मी प्रत्येकवेळी तुम्हाला माझे फोटो काढू देतो.तरीसुद्धा तुम्ही इतकी धडपड करता.' यानंतर फोटोग्राफरला फोटो काढण्यासाठी वरूण पोझ देतो. त्या फोटोग्राफरची विचारपूस करतो. हा सगळा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला असून व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.