Varun Dhwan Does not Like Women : बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर ही तिच्या 'स्त्री 2' या चित्रपटामुळे चांगलीच चर्चेत आहे. तिचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करताना दिसत आहे. श्रद्धाचा हा चित्रपट रोज एक नवा रेकॉर्ड मोडत असल्याचं पाहायला मिळत आहे. 'स्त्री 2' मध्ये अभिनेता वरुण धवननं पाहुण्या कलाकाराची भूमिका साकरली आहे. श्रद्धा कपूर आणि वरुण धवनविषयी बोलायचं झालं तर दोघांचं नातं खूप जून आहे. एका मुलाखतीत श्रद्धानं तिच्या आणि वरुणचा एक मजेशीर किस्सा सांगितला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'स्त्री 2' च्या यशानंतर उत्साहित असलेल्या श्रद्धा कपूरनं शुभंकर मिश्राला नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं की एकदा वरुण धवननं तिच्या प्रपोजलला रिजेक्ट केलं होतं. खरंतर, लहाण असताना वरुण धवन हा श्रद्धा कपूरचा क्रश होता. श्रद्धानं संपूर्ण किस्सा यावेळी सांगितला आहे. लहाण असताना दोघं एका चित्रपटाच्या शूटिंगवर गेले होते. त्या प्रोजेक्टमध्ये त्या दोघांचे वडील काम करत होते. त्या दरम्यान, खेळता-खेळता ते दोघं एका डोंगरावर पोहोचले. तिथेच श्रद्धानं वरुणला प्रपोज केलं होतं. 


श्रद्धानं यावेळी हटके अंदाजमध्ये वरुण धवनकडे तिच्या प्रेमाची कबूली दिली होती. तिनं सांगितलं होतं की मी काही तरी तुला सांगेन पण ते उलटं सांगेन आणि तुला त्याचा अर्थ समजायचा आहे. त्यानंतर श्रद्धानं आय लव्ह यू असं न बोलता. यू लव्ह आय म्हटलं. हे ऐकल्यानंतर वरुण धवन लगेच त्याला मुली आवडत नाही असं सांगत तिथून पळून गेला.


दरम्यान, वरुण धवन आणि श्रद्धा कपूर यांनी 'स्त्री 2' मध्ये पहिल्यांदाच एकत्र काम केलं असं नाही. तर त्यांनी या आधी देखील 'एबीसीडी 2' आणि 'स्ट्रीट डान्सर 3' सारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तर त्या दोघांनी एकमेकांच्या 'भेडिया' आणि 'स्त्री 2' मध्ये पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली होती. 


हेही वाचा : 'या' मराठी चित्रपटासाठी प्रियांका चोप्रा आणि कोठारे कुटुंब पहिल्यांदाच एकत्र!


दुसरीकडे श्रद्धा कपूरच्या 'स्त्री 2' विषयी बोलायचे झाले तर या चित्रपटानं फक्त 5 दिवसात जगभरात 300 कोटीं पेक्षा जास्त कमाई केली आहे. तर भारतात हा आकडा 200 कोटींचा आकडा पार केला आहे. तर या चित्रपटानं भारतात बॉक्स ऑफिसवर 200 कोटींची कमाई केली आहे. तर या चित्रपटाचा बजेट हा फक्त 50 कोटी होता.