मुंबई : रितेश देशमुखने 'वेड' या मराठी चित्रपटातून दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केलं आहे. या चित्रपटात रितेश देशमुखही मुख्य भूमिकेत आहे. यासोबतच त्याची रिअल लाइफ पत्नी जेनेलिया डिसूझा त्याच्या सोबत दिसत आहे. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर ओपनिंगसह जबरदस्त प्रतिसाद मिळाला. चित्रपटगृहांच्या बाहेर मोठी गर्दी दिसून आली. या चित्रपटाने आपल्या ओपनिंग वीकेंड कलेक्शनने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Ved Box Office Collection
'वेड' चित्रपटातील रिअल लाइफ कपल जेनेलिया डिसूझा आणि रितेश देशमुख यांची ऑनस्क्रीन जोडी चाहत्यांना आवडते. या चित्रपटाला समीक्षकांचाही चांगला प्रतिसाद मिळाला आहे. त्याचवेळी वेडचं ओपनिंग वीकेंड कलेक्शन समोर आलं आणि सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. या सिनेमाचा तिसरा आठवडा आहे तरी या सिनेमाचं वेड प्रेक्षकांमध्ये दिसत आहे.पहिल्या आठवड्यात या सिनेमाने 20.67 करोडची कमाई केली होती तर दुसऱ्या आठवड्यात या सिनेमाने 20.18 करोडची कमाई केली. तर तिसऱ्या आठवड्यात या सिनेमाने ५० कोटींचा गल्ला जमावल्याची बातमी समोर येत आहे.


तीन आठवड्यात 50 करोडची कमाई
वेडने रिलीजच्या पहिल्या आठवड्यात 10 कोटी रुपयांची कमाई केली आहे. तर तिसऱ्या आठवड्यात या सिनेमाने 50 कोटींची कमाई केली आहे. 


'वेड'मध्ये आहेत हे कलाकार
'वेड'मध्ये रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूझा यांच्याशिवाय जिया शंकर, अशोक सराफ आणि शुभंकर तावडे हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटात सलमान खानचाही एक कॅमिओ आहे. रितेश आणि जेनेलिया तब्बल 10 वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर 'वेड'वर रोमान्स करून मने जिंकत आहेत.


या चित्रपटाचे दिग्दर्शन रितेश देशमुखनं (Riteish Deshmukh) केलं आहे. या चित्रपटातून जेनेलियानं मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं आहे. या पूर्वी जेनेलियानं हिंदी, तेलगू, तमिळ, कन्नड आणि मल्याळम अशा 5 भाषिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. 'वेड' या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, विद्याधर जोशी तसेच अभिनेता शुभंकर तावडे आणि अभिनेत्री जिया शंकर अनेक कलाकार आहेत. संगीतकार अजय अतुल यांनी वेड चित्रपटातील गाणी संगीतबद्ध केली आहेत. गाणी अजय-अतुल, गुरु ठाकूर यांनी लिहिली आहेत. तर जेनेलिया या चित्रपटाची निर्माती आहे.