पाकिस्तानमध्ये `वीरे दी वेडिंंग` सिनेमावर बंदी
करिना कपूर आई झाल्यानंतर तर सोनम कपूरचं लग्न झाल्यानंतर रिलीज होणारा पहिला सिनमा म्हणजे ` वीरे दी वेडिंग`.
मुंबई : करिना कपूर आई झाल्यानंतर तर सोनम कपूरचं लग्न झाल्यानंतर त्यांचा रिलीज होणारा पहिला सिनमा म्हणजे ' वीरे दी वेडिंग'. या सिनेमामध्ये करिना कपूर, स्वरा भास्कर, सोनम कपूर सोबत शिखा तल्सानिया एकत्र झळकणार आहेत. हा सिनेमा बॉक्सऑफिसवर दमदार कामगिरी करेल असा अंदाज ट्रेड अॅनालिस्टने वर्तवला आहे. चित्रपटाची गाणी आणि ट्रेलर लोकांच्या पसंतीला उतरला आहे. त्यामुळे चित्रपटाबाबत उत्सुकता वाढली आहे. मात्र हा चित्रपट पाकिस्तानमध्ये बॅन करण्यात आला आहे.
काय आहे कारण ?
'वीरे दी वेडिंग' या चित्रपटामध्ये चार मैत्रिणींची कहाणी आहे. या चौघींना कोणत्याही बंधनात न अडकता आपलं जीवन जगायचं असतं. आजच्या तरूणाईचं प्रतिनिधित्व करणार्या या चित्रपटाच्या डायलॉग्समध्ये भाषादेखील तशीच वापरली गेली आहे. त्यामुळे चित्रपटातील काही सिन्स आणि अश्लिल डायलॉग्समुळे हा सिनेमा पाकिस्तानमध्ये बॅन करण्यात आला आहे.
पाकिस्तान सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सेन्सॉरचे चेअरमन दान्याल गिलानी यांनी दिलेल्या एका मुलाखतीमध्ये सेन्सॉर बोर्डाच्या मंडळींनी एकमताने हा निर्णय घेतला आहे. चित्रपटाच्या वितरकांनीदेखील चित्रपटाच्या रिलीजसंबंधीचा अर्ज मागे घेतला आहे.
लग्न आणि तरूणाई
चित्रपटाची कहाणी करिना कपूर साकारत असलेल्या कलिंदी या भूमिकेविषयी फिरत आहे. कलिंदीचं लग्न ठरलं आहे मात्र ती त्याबाबत खूपच गोंधळलेल्या अवस्थेमध्ये असते. या चित्रपटाचे दिग्दर्शन शशांक घोष यांनी केले असून रिया कपूर आणि एकता कपूर या चित्रपटाच्या निर्मात्या आहेत. 1 जूनला हा चित्रपट सिनेमागृहामध्ये प्रदर्शित करण्यात आला आहे.