मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर, करिना कपूर, स्वरा भास्कर आणि शिखा तल्सानिया स्टारर बहुचर्चित सिनेमा वीरे दी वेडींगचे पहिले गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या सिनेमाच्या ट्रेलरने चांगलाच माहोल बनवला आहे. ट्रेलरमध्ये फिमेल बॉडींग पाहायला मिळते. ट्रेलरमध्ये या चारही मैत्रिणींचा बोल्ड अंदाज आणि लूक पाहायला मिळत आहे. हे गाणे देखील काहीसे हटके आहे. काहीसे वेगळे असलेल्या या गाण्यात करिना आणि सोनमचा बोल्ड अंदाज पाहायला मिळत आहे. आजूबाजूला मुलांची वर्णी आहे. पहा व्हिडिओ...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 



करिनाचा कमबॅक


मात्र बोल्ड अंदाज सोडला तर गाण्याचे बोल आणि संगीत फारसे मजेदार वाटले नाहीत. हे गाणे बदाशाहने गायले आहे. या सिनेमाची निर्मिती सोनम कपूरची बहीण रिया कपूरने केली आहे. सिनेमा १ जूनला प्रदर्शित होणार असून या सिनेमातून करिना कपून कमबॅक करत आहे.