मुंबई : दिग्गज कलाकारांच्या जाण्याने बॉलिवूडला एका मागे एक धक्के बसत आहेत. बॉलिवूडमधील आणखी एका कलाकारने जगाचा निरोप घेतला आहे. बॉलिवूडमधील ज्येष्ठ विनोदी अभिनेते जगदीप यांचं निधन झालं आहे. वयाच्या 81वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 'शोले'मधील सूरमा भोपाली ही त्यांची गाजलेली भूमिका. जगदीप यांनी शोले, ब्रम्हचारी, अंदाज अपना अपना, पुराना मंदिर, कुरबानी, शेहनशाह या चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जगदीप याचं खरं नाव सय्यद अहमद जाफरी होतं. 70 आणि 80च्या दशकातल्या चित्रपटांमधील त्यांच्या अनेक भूमिका गाजल्या. नायक ते विनोदी अभिनेता असा त्यांचा खूप मोठा प्रवास होता. जगदीप यांनी 300 हून अधिक चित्रपटांमध्ये काम काम केलं आहे.