मुंबई : मराठी, हिंदी चित्रपट, मालिका, नाटकांमधून आपल्या खास शैलीने कलाविश्वास छाप पाडणारे ज्येष्ठ अभिनेते लिलाधर कांबळी यांचं गुरुवारी वृद्धापकाळाने निधन झालं. ते 83 वर्षांचे होते. गेल्या दोन वर्षांपासून ते कर्करोगाशी झुंज देत होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मराठी नाट्यसृष्टतील विनोदी, ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक लिलाधर कांबळी यांचं ठाण्यात निधन झालं. लिलाधर कांबळी त्यांच्या अस्सल मालवणी संवादफेकसाठी त्यांची ओळख होती. मच्छिंद्र कांबळी यांच्या वस्त्रहरणमध्ये त्यांनी काम केलं होतं. मालवणी फेम ‘केला तुका आणि झाला माका’ या नाटकातही त्यांनी भूमिका साकारली होती. 


दिलीप प्रभावळकर यांची प्रमुख भूमिका असलेलं हसवा फसवीमधील वाघमारे, वस्त्रहरणमधील जोशी मास्तर, वात्रट मेलेमधील पेडणेकर मामा या व्यक्तीरेखा विशेष गाजल्या. आतापर्यंत त्यांनी 100हून अधिक नाटकांत भूमिका साकारल्या आहेत.