मुंबई : ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते नसिरुद्दीन शाह यांनी कायमच त्यांच्या अभिनयानं प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. दमदार भूमिका तितक्याच ताकदीनं साकारणाऱ्या कलाकारांपैकीच शाहसुद्धा एक. त्यांच्या अशा अनेक कलाकृती आहेत, ज्या पाहून नवोदित कलाकार या अभिनेत्यापासून प्रेरणा घेताना दिसतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अचानकच नसिरुद्दीन शाह यांची चर्चा होण्याचं कारण ठरतंय ते म्हणजे ते झुंज देत असणारा एक गंभीर आजार. 


 ‘ओनोमॅटोमेनिया’ (Onomatomania) या आजाराचा सामना सध्या शाह करताना दिसत आहेत. एका मुलाखतीत खुदद् त्यांनीच यासंदर्भातील खुलासा केला. 


काय आहे हा आजार ? 
 ‘ओनोमॅटोमेनिया’ (Onomatomania) एक अशी मेडिकल कंडिशन आहे, जेव्हा लोक त्यांचं म्हणणं किंवा एखाद्या शब्दाचा वारंवार पुनरुच्चार करतात. 


'मी थट्टा करतच नाहीये. तुम्ही हवंतर शब्दकोषात याचा अर्थ पाहू शकता. मी कायम असं करत आलो आहे. मी कधीच शांतपणे बसू शकत नाही', असं म्हणत आपण झोपतेवेळीसुद्धा आवडत्या एखाद्या परिच्छेदाचा पुनरुच्चार करतो असंही त्यांनी सांगितलं. 


काय आहे हा नेमका आजार ? 
तज्ज्ञांच्या मते हा शब्दश: एखादा आजार किंवा मानसिक स्थिती नाही. पण, यामुळं काहींना नक्कीच अडचण वाटते. या अशा वागण्यामुळं जर त्यांच्या जीवनशैलीवर परिणाम होणार असेल तर ही मेडिकल कंडिशन ठरु शकते.