Gargi Pule in NCP: ज्येष्ठ अभिनेते स्वर्गीय निळूभाऊ फुले यांच्या कन्या अभिनेत्री गार्गी फुले यांचा आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (Gargi Phule in NCP) प्रवेश होत आहे. अजित पवार, सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत गार्गी फुले यांचा राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये पक्ष प्रवेश होणार आहे. यासाठी जयंत पाटील आणि अजित पवार (Ajit Pawar) प्रदेश कार्यालयात पोहचले आहेत. अभिनेत्री गार्गी फुले यांनी अनेक मराठी चित्रपटांमधून कामं केली आहे. त्यांची 2018 साली आलेली झी मराठी वाहिनीवरील 'तुला पाहते रे' ही मालिका प्रचंड गाजली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावेळी अभिनेत्री गार्गी फुले यांनी यावेळी अजित पवारांसाबोत काम करण्याची इच्छा व्यक्त केली. त्या म्हणाल्या, ''मला अनेक दिवसांपासून अजित पवार यांच्यासोबत काम करण्याची इच्छा होती. मला विचारणा झाल्यानंतर लगेचच मी हो म्हटलं. राष्ट्रवादी पक्षाची जी विचारसरणी व विचार आहेत त्याच विचारसरणीचे माझे बाबा निळू फुले (Nilu Phule) होते. त्यामुळे माझ्या वडिलांचे जे विचार होते त्या विचारांना राष्ट्रवादी कॉंग्रेस न्याय देईल.'' 


यापुढे त्या म्हणाल्या की, ''राष्ट्रवादी पक्षासोबत मला काम करण्याचा आनंद आहे. शरद पवार, सुप्रिया सुळे, अजित पवार या सर्वांचे माझ्या वडिलांशी चांगले संबंध होते. आता मला पक्षासाठी काहीतरी करण्याची इच्छा आहे'', असं त्या म्हणाल्या. ''त्यामुळे मी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये येऊन प्रवाहात येईल. आता नुसतं किनाऱ्यावर बसून पाहायचं नाही आहे. मुख्य प्रवाहात येऊन काम करायचं मी ठरवलं आहे. तरूणांना वाटतं राजकारणात यावं आणि बदल करावा त्यानुसार माझा सुद्धा प्रयत्न असेल'', असं म्हणत भविष्यात पक्षानं तिकीट दिलं तर का नाही लढणार? असंही त्या म्हणाल्या.   


हेही वाचा -  'आमच्यासाठी गर्वाचा क्षण'; माधुरी अन् श्रीराम नेनेंनी धाकट्या मुलासाठी केली भावुक पोस्ट


गार्गी फुले यांनी 1998 साली प्रायोगिक नाटकांतून मनोरंजन सृष्टीत प्रवेश केला होता. सत्यदेव दुबे यांच्याकडेही त्यांनी शिक्षण घेतले आहे. 'समन्वय' नाट्यसंस्थेच्याही प्रायोगिक नाटकातून त्यांनी भुमिका केल्या आहेत. 'मळभ', 'कोवळी उन्हं', 'श्रीमंत', 'वासंती', 'जीर्णनी', 'सुदामा के चावल', 'सोनाटा' अशा नाटकांमधून त्यांनी काम केलं आहेत. त्या सोशल मीडिया आणि वेबसिरिजमध्येही दिसतात. गार्गी फुले या इन्टाग्रामवरही सक्रिय आहेत. त्यांना एक लहान मुलगाही आहे. त्या आपल्या वेकेशनचे फोटोही इन्टाग्रामवरून शेअर करताना दिसतात. सध्या त्यांच्या या राष्ट्रवादीच्या प्रवेशानंतर गार्गी फुले कोणत्या माध्यमातून दिसणार याची त्यांच्या चाहत्यांना लवकरच माहिती कळू शकेल.