मुंबई : ज्येष्ठ अभिनेते, रंगकर्मी,  रवी पटवर्धन यांचं निधन झालं आहे. ते ८३ वर्षांचे होते. ह्रदयविकाराचा झटका आल्यामुळे त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांना शनिवारी रात्री त्यांना श्वास घेण्यात त्रास जाणवत होता. त्यामुळे त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतू उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याआधी नोव्हेंबरमध्ये त्यांना ह्रदयविकाराचा झटका आला होता.  आज सकाळी ११ वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्का केले जाणार आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यांनी त्यांच्या कार्यकाळात अनेक मालिका, नाटक, चित्रपटांच्यामध्यमातून चाहत्यांच्या मनात आधिराज्य गाजवलं. 'अग्गं बाई सासूबाई...' या मालिकेच्या माध्यमातून देखील प्रेक्षकांनी त्यांना भरभरून प्रेम दिलं. मालिकेतील त्यांच्या भूमिकेने त्यांनी चाहत्यांच्या मनात घर केलं होते. आता त्यांच्या अशा अचानक जाण्याने संपूर्ण टीम सोबतच मराठी कलाविश्वाला मोठा धक्का बसला आहे. 


त्यांनी आतापर्यंत दीडशेहून अधिक नाटकांमध्ये आणि २०० हून अधिक चित्रपटांमध्ये भूमिका साकारली आहे. त्यांच्या रूबाबदार व्यक्तीमत्त्वामुळे त्यांना 'गावचा पाटील', पोलीस आयुक्त, न्यायाधीश अशा एक ना अनेक नाटकांमध्ये आणि चित्रपटांमध्ये भूमिका साकारण्याची संधी मिळाली.