मुंबई : ज्येष्ठ गीतकार आणि लेखक जावेद अख्तर यांनी अभिनेत्री कंगना राणौत हिच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा ठोकला आहे. अभिनेता हृतिक रोशन याच्याविरोधात काहीही न बोलून मौन बाळगण्याच्या अख्तर यांच्या भूमिकेवर कंगना मागील काही काळापासून सातत्यानं निशाणा साधत होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका मुलाखतीत ती अख्तर यांच्याविषयी म्हणाली होती, 'एकदा जावेद अख्तर यानी मला घरी बोलावलं होतं. राकेश रोशन आणि त्यांचे कुटुंबीय हे सारे मोठे व्यक्ती आहेत असं ते म्हणाले होते. तू त्यांची मदत घेतली नाहीस तर तुझ्याकडे आणखी कोणताच पर्याय नसेल. ते तुला कारागृहात टाकतील. तुला आत्महत्या करावी लागेल'. हे खुद्द जावेद अख्तर यांचेच शब्द असल्याचं तिनं स्पष्ट केलं. हृतिकची माफी मागण्यावाचून आपल्याकडे कोणताही पर्याय नसल्याचं सांगताना ते आपल्यावर प्रचंड ओरडले होते असा गौप्यस्फोटही तिनं केला होता. 


अख्तर यांच्यावर करण्यात आलेल्या या आरोपांचा तिनं कित्येकदा पुनरुच्चार केला आहे. किबंहुना तिच्या बहिणीनंही त्यांच्यावर टीका कोली होती. 


 



जावेद अख्तर यांनी मुंबईतील मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेटकडे यासंदर्भातील तक्रार केली. जवळपास ८ महिन्यांपूर्वी कंगनाची बहीण रंगोली हिनं जावेद अख्तर यांनी कंगनाला हृतिक रोशनची माफी मागण्यासंदर्भात धमकावलं आहे असं ट्विट केलं होतं. त्याच धर्तीवर अख्तर यांनी उचललेलं हे पाऊल पाहता आता कंगना यावर काय उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.