मुंबई : १९६० आणि सत्तरचे दशक गाजविणा-या ज्येष्ठ अभिनेत्री उमा भेंडे यांचं आज मुंबईत राहत्या घरी निधन झालं. त्या 72 वर्षांच्या होत्या. आकाशगंगा या सिनेमातून त्यांनी साठच्या दशकात मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केलं. त्यानंतर काही मोजक्यात पण प्रेक्षकांच्या कायम स्मरणात राहिलेल्या चित्रपटांमधून त्यांनी आपली अभिनयाची वेगळी छाप उमटवली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भालू हा त्यांचा सर्वाधिक गाजलेला चित्रपट. आम्ही जातो आमुच्या गावा, प्रेमासाठी वाट्टेल ते, आई थोर तुझे उपकार, मल्हारी मार्तंड आदी चित्रपटांतून त्यांनी आपल्या अभिनयाचा एक वेगळा बाज राखला.


मराठीसह तेलुगू, तमीळ भाषांतील काही चित्रपटांमध्येही त्यांनी काम केलं. गेल्या आठ-दहा दिवसांपासून त्यांना ह्रदयविकाराचा त्रास जाणवत होता. गेल्याच आठवड्यात त्यांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्येही दाखल करण्यात आलं होतं. मात्र अखेर आज या हरहुन्नरी अभिनेत्रीनं अखेरचा श्वास घेतला.