मुंबई : मल्याळम चित्रपटसृष्टीचे  प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक एम. के. अर्जुनन यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८४ वर्षांचे होते. तब्बल २०० चित्रपटांमधील ७०० हून अधिक गाण्यांना त्यांनी संगीतबद्ध केलं आहे. संगीतावरील प्रेमामुळे त्यांना अर्जुनन मास्टर म्हणूनही संबोधलं जातं. कोची येथील निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.  त्यांच्या अशा अचानक जाण्यामुळे संगीत विश्वाला मोठ्या धक्का बसला आहे. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऑस्कर पुरस्कार विजेते ए. आर. रेहमान यांना १९८१ मध्ये अर्जुनन यांनी कामाची पहिली संधी दिली होती.  तर १९६८ साली त्यांनी 'कृतापौर्णमी' या चित्रपटाच्या माध्यमातून मल्याळम चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. 


त्यांच्या नावावर अनेक एव्हरग्रीन गाणी आहेत. चित्रपटांसोबतच त्यांनी नाटकांनाही संगीत दिलं. लहानपणापासूनच त्यांना संगीतात रस होता. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्यावर अनेकांनी श्रद्धांजली वाहिली आहे.