मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनाची बातमी आली आणि सारंकाही शांत झालं. कुठे पानांची सळसळ थांबली, कुठे वाराही मंद झाला आणि कुठे समुद्राच्या उसळणाऱ्या लाटाही शांत होताना दिसल्या. जणूकाही हा निसर्गही एका चमत्काराला गमावण्याचं दु:ख व्यक्त करत होता. (Lata Mangeshkar Demise)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हाडामांसाच्या माणसानं जिथं अश्रुंवाटे दीदींच्या जाण्याचा शोक व्यक्त केला तिथेच अबोल, मूक घटकांनीही त्यांच्या कृतींतून दीदींना अखेरचा निरोप दिला. 


दीदी गेल्या आणि त्यांच्या जीवनातील विविध प्रसंग, आठवणी हे सारंकाही मागे ठेवून गेल्या. 


कैक पिढ्यांसाठी लता दीदींचा आवाज म्हणजे एक संस्कार होता. अशाच पिढ्यांनी त्यांना कायम पाहिलं ते म्हणजे पांढऱ्या शुभ्र साडीमध्ये. 


दीदींनी रंगीत साड्या नेसल्या नाहीत अशातला भाग नाही. पण, पांढऱ्या रंगावर त्यांचं विशेष प्रेम. किंबहुना हा रंग परिधान करण्यामाहे एक मुख्य कारण. 


एका मुलाखतीदरम्यान त्यांनी यामागचं कारण सांगितलं होतं. पाहा त्या काय म्हणाल्या होत्या... 


'मी जेव्हाही रंगीत कपडे घालायचे तेव्हा काही ना काही व्हायचं. मला ते आवडायचं नाही. मी जेव्हा केव्हा रंगीत वस्त्र घालायचे तेव्हा असं वाटायचं की कोणीतरी माझ्यावर रंग उधळलाय, मला ते नाही आवडायचं...', बस्स, त्या प्रसंगांपासूनच दीदींनी पांढऱ्या रंगाला पसंती दिली. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by RJ Anmol (@rjanmol27)


विविध प्रकारच्या किनार असणाऱ्या शुभ्र साड्या नेसून दीदी जेव्हा जेव्हा समोर आल्या, तेव्हा तेव्हा प्रत्येक वेळी त्यांची झलक पाहूनच अनेकांच्या मनाला सुखद दिलासा मिळाला. 


अशीच तुमच्या मनात घर केलेली दीदींची आठवण कोणती?