`या` लोकप्रिय निर्मात्याच्या निधनानं चित्रपटसृष्टीवर शोककळा
लोकप्रिय निर्मात्याच्या निधनानं चित्रपटसृष्टीवर शोककळा, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सेलिब्रिटींनी श्रद्धांजली वाहिली आहे.
K Muralidaran Death : तामिळ चित्रपट निर्माते के. मुरलीधरन यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनाच्या बातमीनं चित्रपटसृष्टीतून हळहळ व्यक्त केली जात आहे. के. मुरलीधरन यांना हृदयविकाराचा झटका आल्यानं त्यांचे निधन झाल्याचे म्हटले आहे. मुरलीधरन यांचे तामिळनाडूतील कुंभकोणम येथे अखेरचा श्वास घेतला. मुरलीधरन हे तमिळ निर्माता परिषदेचे माजी अध्यक्षही होते.
व्ही स्वामीनाथन आणि जी वेणुगोपाल यांच्या मदतीनं त्यांनी स्वतःचे प्रोडक्शन हाऊस 'लक्ष्मी मूव्ही मेकर्स' सुरू केले. के. मुरलीधरन यांनी अंबे शिवम, पुधूपेट्टाई आणि बागवती असे अनेक यशस्वी दाक्षिणात्य चित्रपटांची निर्मिती केली होती. मुरलीधरन यांनी अनेक बड्या कलाकारांचं करिअर केले आहे. त्यांच्या निधनानंतर दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अनेकांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
हेही वाचा : मुलीमुळे Shahrukh Khan नं घेतला चित्रपटातून ब्रेक! अभिनेत्यान केला मोठा खुलासा
दाक्षिणात्य आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार कमल हासन यांनी निर्माते मुरलीधरन यांच्या निधनानंतर ट्वीट करून त्यांना श्रद्धांजली वाहिली. त्यांनी लिहिले, 'लक्ष्मी मूव्ही मेकर्सचे निर्माते ज्यांनी अनेक सुपरहिट चित्रपट दिले. आज ते आपल्यात नाही. प्रिय शिवा, मला ते दिवस नेहमी आठवतील.' अभिनेते मनोबाला यांनी ट्वीट करत निर्मात्याच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत लिहिले की, 'ही अत्यंत दुःखद आणि धक्कादायक बातमी आहे, मुरलीधरन आता आमच्यात नाहीत'. याशिवाय दक्षिण चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध निर्माते के.टी. कुंजुमन यांनी ट्विटमध्ये लिहिले की, 'ही दुःखद बातमी ऐकून खूप मोठा धक्का बसला. तमिळ चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय निर्माते आणि माझ्या खास मित्राचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.'