श्रीवल्ली गाण्याच्या dance step बद्दल खुद्द बीग बींकडून मोठा खुलासा!
पण या dance step बद्दल खुद्द बीग बींनी खुलासा केला आहे.
Pusha Iconic Dance Step: मागच्या वर्षी रिलिज झालेल्या 'पुष्पा - द राइज' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर पुरता धुमाकूळ घातला होता. देशभरातून या चित्रपटावर प्रेक्षकांनी प्रचंड प्रेम केले. चित्रपटातील श्रीवल्ली गाण्याची स्टेप तर जगभरात फेमस झाली. पण या dance step बद्दल खुद्द बीग बींनी खुलासा केला आहे.
खरंतर 'पुष्पा' चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच अर्जुनने श्रीवल्ली गाण्यातून त्याच्या आयकॉनिक स्लिपर स्टेपने एक डान्स ट्रेंड सेट केला. या डान्स स्टेपने सोशल मीडियावर तर पुरता धुमाकुळ घातला होता. नेटकऱ्यांनी या स्टेपवरून तूफान इन्स्टा रिल्स बनवल्या आणि बघता बघता या स्टेपची सोशल मीडियावरील क्रेझ इतकी वाढली की चक्क ही डान्स स्टेप सिग्नेचर स्टेप बनली.
परंतु तुम्हाला माहितीये का की स्वतः बींग बींनी या डान्स स्टेप एक खुलासा केला आहे ज्याचा पत्ताच कदाचित तुम्हाला नसेल. 'कौन बनेगा करोडपती'चा चौदावा सिझन नुकताच सुरू झाला आहे. सध्या या शोमुळे अमिताभ बच्चन चर्चेत आले आहेत. त्याचसोबत नुकत्याच एका एपिसोडमध्ये त्यांनी श्रीवल्ली या गाण्याबद्दल केलेल्या खुलासामुळे सध्या तेही चर्चेत आहेत.
काय म्हणाले बीग बी?
समोर आलेल्या माहितीनुसार अमिताभ बच्चन यांना गेमच्या दरम्यान पुष्पा चित्रपटाबद्दल एक प्रश्न विचारण्यात आला आणि तेव्हा त्यांनी श्रीवल्ली गाण्याच्या डान्स स्टेप मागील गंमतही सांगितली. हल्लीच ते हैद्राबादमध्ये एका चित्रपटाच्या शुटिंगसाठी गेले होते. तिथे ते अभिनीत करत असलेल्या चित्रपटाच्या दिग्दर्शकांना त्यांनी अल्लु अर्जुनच्या डान्स स्टेपबद्दल विचारले. तो प्रश्न असा होता की अल्लु अर्जुनने केलेली ती डान्स स्टेप कोरिओग्राफ्ड होती का स्पॉन्टेनियस होती. तेव्हा दिग्दर्शक असं म्हणाले की ती स्पॉन्टेनियस होती. अल्लु अर्जुनने चुकून ती चप्पल काढली आणि तेव्हा दिग्दर्शक सुकूमारांनी अल्लुला ती स्टेप तशीच ठेवायला सांगितली आणि ती स्टेप हिट झाली.