त्यांच्यात सगळं काही ठिक आहे ना! काही दिवसांपूर्वीच झालं भांडण आणि आता...
अंकिता लोखंडे आणि विक्की जैन टीव्ही इंडस्ट्रीचं फेवरेट कपल आहे. मात्र....
मुंबई : अंकिता लोखंडे आणि विक्की जैन टीव्ही इंडस्ट्रीचं फेवरेट कपल आहे. दोघांनी जेव्हापासून लग्न केलंय तेव्हापासून सगळीकडे फक्त त्यांचीच चर्चा आहे. अंकिता आणि विकी गेल्यावर्षी लग्नबंधनात अडकले. दोघांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर नेहमी व्हायरल होत असतात. अंकिता आणि विकी यावेळी शो 'स्मार्ट जोडी'मध्ये दिसणार आहेत.
दोघांची केमिस्ट्री चाहत्यांनादेखील फार आवडते. नुकतंच विकीने एक वक्तव्य केलयं. जे ऐकून सगळ्यांनाच धक्का बसला. अंकिताबद्दल बोलताना विकी म्हणाला की, ''दोन वर्षांपासून अंकिताच्या घरी मी घरजावई म्हणून राहत आहे''.
अंकिता आणि विकीने नुकतंच आपल्या एका मुलाखतीमध्ये मॅरेज लाईफ आणि नवीन घराबाबतची मोठी गोष्ट सांगितली. दिलेल्या एका मुलाखतीमध्ये विकी म्हणाला, आम्ही नुकताच एक नवीन फ्लॅट खरेदी केला आहे. ज्याचं रेनोवेशनचं काम कोविड महामारीमुळे पुर्ण होवू शकलं नव्हतं.
या कामाला बराच वेळ ब्रेक लागला. हे काम आताही पुर्ण होवू शकलं नाहीये. ज्याच्यामुळे आम्ही नव्या घरात शिफ्ट होवू शकत नव्हतो. मी आताही अंकिताच्या घरी घरजावई म्हणून राहतोय. मी जेव्हाही मुंबईत येतो तेव्हा मी तिच्याच घरी राहतो.
गेल्या दोन वर्षांपासून शेअर करतेय घर
विकी पुढे म्हणाला की, तुम्ही अंकिताला विचारा की, तिला कसं वाटतं कारण ती गेल्या दोन वर्षांपासून तिचं घर आणि वॉर्डरोब माझ्यासोबत शेअर करत आहे. अंकिता म्हणाली की, मला वाटतं की जेव्हा आपण पती-पत्नी सारखे एकाच छताखाली राहू लागलो तेव्हा एक कपल म्हणून आपलं जीवन सुरू होईल.
जेव्हा आम्ही आमचं घर बांधायला सुरुवात केली तेव्हा आमच्या कपलच्या प्रवासाची सुरुवात होती. मला माहीत आहे की, मी एक चांगली पत्नी होणार आहे आणि सगळं काही व्यवस्थित सांभाळणार आहे.स्मार्ट जोडीमध्ये अंकिता लोखंडे आणि विक्की जैन धमाल करताना आपल्याला दिसणार आहेत. ते आपली केमिस्ट्रीमधून शोमध्ये प्रत्येकाच्या हृद्ययावर राज्य करतात.