Ankita Lokhande-Vicky Jain : सध्या सगळीकडे 'बिग बॉस 17' ची चर्चा सुरु आहे. त्यातही अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि तिचा पती विकी जैन आहे. त्या दोघांचं नातं हे टॉक ऑफ द टाऊन आहे असं म्हणता येईल. कारण त्या दोघांमध्ये बिग बॉसमध्ये आल्यापासून सतत भांडण किंवा वाद होत आहेत. काही दिवसांपूर्वी तर अंकितानं विकीकडे थेट घटस्फोट मागितला. मात्र, शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या एपिसोडमध्ये असं काही झालं की सगळ्यांना आश्चर्य झालं आहे. त्याचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होतोय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अंकिता लोखंडे, विकी जैन, अभिषेक कुमार आणि अरुण माशेट्टी हे एका रुममध्ये बसल्याचे पाहायला मिळते. अंकिता आणि अरुण यांच्यात खूप मोठा वाद सुरु असतो, दुसरीकडे विकी आणि अभिषेक एकमेकांमध्ये काही चर्चा करत होते. अंकिता आणि अरुणच्या वादाला विकी कंटाळला होता आणि तो सतत त्यांना शांत बसायला सांगत होता. अंकिता म्हणाली की ती त्यांच्यात बोलत नाही आहे. ती फक्त अरुणशी बोलते. अंकितासोबत सुरु असलेल्या या वादात विकी इतका चिडतो की तो तिच्यावर हात उचलण्याचा प्रयत्न करतोय. खरंतर, तो असं करत नाही. तो रागात त्याच्या अंगावर असणारं ब्लॅकेट काढत तिथून जाण्याचा प्रयत्न करतो. विकीचं हे रुप पाहिल्यानंतर अंकिता देखील आश्चर्यचकीत होते. 



विकी जैनच्या या वागण्यावर अंकिता लोखंडेनं काहीही प्रतिक्रिया दिली नाही. मात्र, अरुण माशेट्टी आणि अभिषेक कुमारनं या गोष्टीला पाहिलं आणि त्यावर बोलण्यास सुरुवात केली. पण अंकिता ही तिच्या नवऱ्याच्या बाजूनंच बोलत होती. त्यावेळी ती म्हणाली की लोकं तिच्या नवऱ्याला म्हणजेत विकीची बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहेत. हा वाद फार वाढल्यानंतर अंकिता किचन एरियामध्ये विकीला समजावताना दिसली. तर दुसरीकडे जेव्हा अभिषेक विकीला बोलू लागला तेव्हा अंकितानं त्याच्या भुतकाळातील गोष्टीवर बोलत त्याला उत्तर दिलं. 



हेही वाचा : सलमानला Love You म्हणतं चाहतीनं केलं Kiss, VIDEO होतोय व्हायरल


सगळ्या गोष्टी इथे संपल्या नाही तर सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतोया. या व्हिडीओत विकी जैनच्या या वागण्यावरून मोठा वाद सुरु झाला आहे. लोकांनी त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. एक नेटकरी म्हणाला की 'हे फार वाईट आहे. मला अंकितासाठी फार वाईट वाटतंय. तिनं अशा घाणेरड्या व्यक्तीला सोडायला हवं. विकी अंकिताला कानशिलात लगावणार होता.' दुसरा नेटकरी म्हणाला की 'हे स्पष्ट झालं आहे की विकीनं अंकिताला कानशिलात लगावण्याचा प्रयत्न केला होता. अरुण आणि अभिषेक योग्य बोलत होते.' तिसरा नेटकरी म्हणाला की 'हे चुकीचं आहे. विकीनं जवळपास अंकिताच्या कानशिलात लगावली होती. ही लाजिरवाणी गोष्ट आहे. विकी त्याच्या बायकोचा सन्मान करु शकत नाही. इतकंच नाही तर तो नॅशनल टीव्हीवर तिच्याशी असा वागतो. त्यामुळे तो घरी तिच्यासोबत कसा वागत असेल याचा मी विचारही करू शकत नाही.'